सॅमसंगच्या ग्रँड निओची छायाचित्रे लीक

सॅमसंग आपल्या गॅलॅक्सी ब्रँडखाली मिडीयम बजेट स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत असून या फोनची छायाचित्रे इंटरनेटवर लीक झाली आहेत. या चित्रांनुसार हा स्मार्टफोन ग्रँड १ प्रमाणेच आहे. नवीन स्मार्टफोन ग्रँड निओ नावाने येत आहे.

या फोनला ५.०१ इंची टीएफटी स्क्रीन असेल. तसेच १ जीबी रॅम, ८जीबीची इंटरर्नल मेमरी, पाच मेगापिक्सलचा रियर कॅमेरा तसेच फं्रट कॅमेरा, ड्युअल सिम फिचरसह मल्टीटास्कींग सुविधा देण्यात येणार असल्याचे समजते. अँड्राईड जेलीबिन ४.२ ची ऑपरेटिंग सिस्टीम या फोनला देण्यात आली आहे. मात्र त्याची किंमत किती असेल याविषयी कांहीही माहिती देण्यात आलेली नाही.

Leave a Comment