महायुतीत रामदास आठवले केवळ शोभेपुरतेच

मुंबई- काही दिवसापूर्वीच रिपाईचा शिवसेना-भाजप युतीमध्ये समावेश झाल्यानंतर ही महायुती झाली. मात्र महायुतीमधील रामदास आठवले यांचे स्थान फक्त शोभेपुरतेच असल्याचे सिद्ध झाले. नव्याने महायुतीत सामील झालेल्या राजू शेट्टी यांना लोकसभेच्या दोन जागा तातडीने देऊ केल्या आहेत. मात्र रामदास आठवले यांना अद्याप कोणतेही आश्वासन देण्यात आलेले नाही.त्यायमुळे आगामी काळात रामदास आठवले काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे.

दरम्यान, आठवले यांनी अपमान सहन करत युतीसोबत राहण्यापेक्षा सन्मानाने आघाडीत सामील व्हावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.लोकसभा निवडणुकीमध्ये ताकद वाढविण्यासाठी शिवसेना-भाजप युतीने राजू शेट्टी यांना आपल्या गळाला लावले आहे.

याबाबत मंगळवारी ‘मातोश्री’वर बैठक झाली. या बैठकीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे, राजू शेट्टी, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे, शिवसेना नेते सुभाष देसाई उपस्थित होते. मात्र नवा भिडू मिळवीत असताना जुने मित्र रामदास आठवले यांच्याकडे सपशेल दुर्लक्ष केले आहे. त्यािमुळे आगामी काळात रामदास आठवले काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे.

Leave a Comment