बीडमधून अजित पवांरानी निवडणूक लढवावी- मुंडे

बीड- आगामी काळात होत असलेल्या लोकसभा निवडणूकीत बीडमध्ये माझ्या विरोधात अजित पवारांना तगडा उमेदवार काही केल्या भेटत नाही. माझ्या दृष्टीने खरा तगडा उमेदवार अजित पवार हेच आहे. त्यांनी बीडमधून निवडणुकीसाठी उभे राहावे मी त्यांचे स्वागत करतो. असे सांगत भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी अजित पवार यांचे आव्हान स्विकारले आहे.

काही दिवसांपुर्वी बीडमध्ये राष्ट्रवादीला तगडा उमेदवार हवा आहे. कुणी नाही मिळाला, तर मीही उभा राहीन, असे अजित पवार म्हणाले होते. गोपीनाथ मुंडे यांनी एका खास मुलाखत घेतली यावेळी त्यांनी अजित पवारांचे आव्हान त्यांनी जाहीरपणे स्वीकारत बीडमध्ये निवडणूक लढवण्याचे आमंत्रण दिले आहे. त्यामुळे आता पवार हे मुंडेचे आव्हातन स्वी कारणार की नाही याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

काही दिवसापूर्वीच गोपीनाथ मुंडे यांच्या हाताखालून त्यांच्या पुतण्या धनंजय मुंडे यांना आपल्या पक्षात आणण्याचा पराक्रम अजित पवारांनी करुन दाखवला. त्यामुळे बीडच्या राजकारणात राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असा सामना न राहता गोपीनाथ मुंडे विरुद्ध अजित पवार असाच राहिला आहे. आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेने महायुतीत प्रवेश केल्यामुळे महायुतीची ताकद वाढली आहे. स्वाभिमानी महायुतीत आल्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात महायुतीला फायदा होणार हे स्पष्ट दिसत आहे. महायुतीचे नेतेही आता बोलत आहे. गोपीनाथ मुंडेंनी ‘स्वाभिमानी’मुळे कसा फायदा होईल याबद्दलचा खुलासा केला आहे.

Leave a Comment