पासपोर्ट साठी बँक पासबुक अॅड्रेस प्रूफ म्हणून चालणार

मुंबई – पासपोर्टसाठी अर्ज करताना यापुढे बँकेचे पासबुकही अॅड्रेस प्रूफ म्हणून ग्राह्य धरले जाणार आहे. परराष्ट्र मंत्रालयाने सार्वजनिक क्षेत्रातील कांही विशिष्ठ बँकांचे पासबुक अथवा स्टेटमेंट पासपोर्टसाठी अॅड्रेस प्रूफ म्हणून चालणार असल्याचे नुकतेच जाहीर केले असून त्यात स्टेट बँक, आयडीबीआय या बँकाचाही समावेश आहे.

क्षेत्रीय पासपोर्ट अधिकारी सी. पंडियन याविषयी माहिती देताना म्हणाले की आजपर्यंत पासपोर्टसाठी अर्ज करताना लाईट बील, पाणी बील अथवा टेलिफोन बिलाची फोटोकॉपी संबंधितांना द्यावी लागत असे अथवा १ वर्षाचे बँक स्टेटमेंट सादर करावे लागत असे. यापुढे मात्र पासपोर्ट इच्छुकांनी बँकेचे पासबुक अथवा स्टेटमेंट दिले तरी ते अॅड्रेस प्रूफ म्हणून ग्राह्य धरले जाणार आहे.

Leave a Comment