नवी दिल्ली – भारतातील खाजगी गुंतवणुकीचे प्रमाण डिसेंबर अखेर संपलेल्या तिमाहीमध्ये ५४ टक्क्यांनी घटले असल्याचे दिसून आले आहे. गतवर्षीच्या याच कालावधीत भारतात १६१ अब्ज डॉलर्स गुंतवणुकीचे प्रकल्प जाहीर झाले होते. परंतु यावर्षी या घोषणांमध्ये ५४ टक्क्यांची घट झाली आहे.
नवी दिल्लीच्या सीटी रिसर्च या संस्थेच्या इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर इन साईट या अहवालामध्ये ही माहिती देण्यात आली आहे. पंतप्रधानांनी भारतातली गुंतवणूक वाढविण्याच्या विविध योजना जाहीर केल्या असूनही परदेशी गुंतवणुकीत तर वाढ झाली नाहीच पण देशी गुंतवणूक सुद्धा वाढलेली नाही.
भारतातल्या बर्याच उद्योगपतींनी याच काळात स्वदेशात गुंतवणूक करण्याऐवजी परदेशात गुंतवणूक करणे पसंत केले आहे हीही विसंगती या अहवालात दाखवून देण्यात आली आहे.