ऑडी आर एक्स ७ भारतात सादर

जर्मन कार उत्पादक कंपनी ऑडीने त्यांची आर एक्स ७ स्पोर्टबॅक लक्झरी कार सादर केली आहे. मुंबईत या गाडीची एक्स शो रूम किंमत १ कोटी २८ लाख रूपये आहे आणि पहिली गाडी बॉलीवूड अभिनेता सलमान खान याला दिली गेली आहे. त्याच्याच हस्ते या गाडीचे ओपनिंग केले गेले.

ऑडीच्या आर एक्स पाच मॉडेलला मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे कंपनीला बूस्ट मिळाला असल्याचे ऑडी इंडियाचे प्रमुख जो किंग यांनी सांगितले. ते म्हणाले, नवी लक्झरी स्पोर्टस कार उत्तम डिझाईन, आकर्षक स्पोर्टीनेसमुळे स्पोर्टस कार विभागात बेंचमार्क ठरेल अशी आम्हाला खात्री आहे. स्पोर्टस् कार मध्ये वर्षात १० हजार गाड्या विकणारी ऑडी ही देशातील पहिली लक्झरी कार उत्पादक कंपनी आहे. २०१३ मध्ये कंपनीने १०००२ गाड्या विकल्या होत्या.

पहिली सहामाही विक्रीच्या दृष्टीने निवडणुकांमुळे कदाचित थोडी संथ जाण्याची शक्यता कंपनीने गृहित धरली असून त्यानंतर मात्र विक्रीला चालना मिळेल असेही किग यांचे म्हणणे आहे. कंपनी डिलरची संख्याही ३४ वरून ४० वर नेणार आहे. कंपनी भारतात त्यांची १२ मॉडेल्स विकत आहे.

Leave a Comment