आयपीएलचा ४८० कोटीचा लिलाव ठरणार रोमांचक

मुंबई – ‘इंडियन प्रिमिअर लीग’ अर्थात ‘आयपीएल’चा सातवा सीझन आता लवकरच सुरू होणार आहे. त्याची तयारी आतापासूनच सुरू झाली आहे. आयपीएलच्या टीमची संख्या ९ वरून ८ झाली आहे. यामुळेच इतर क्रिकेटपटूंप्रमाणेच सहारा पुणे वॉरियर्सचे क्रिकेटपटूही लिलावासाठी उपलब्ध होणार आहेत. अनेक टीम्सनी केवळ एकेका क्रिकेटपटूला टीममध्ये कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यायमुळेच आता आगामी काळात ४८० कोटींचा हा लिलाव रोमांचक ठरणार असल्याेने सर्वांचे याकडे लक्ष लागले आहे.

आयपीएल’च्या सातव्या सीझनसाठी १२ फेब्रुवारीला लिलाव होणार आहे. सारेच फ्रेंचायझी आपल्या टीमला मजबूती देण्यासाठी जगभरातील क्रिकेटर्सवर बोली लावणार आहेत. अर्थातच क्रिकेटपटूंवर बोली कुठे लागणार ते अजूनही ठरलेलं नाही. गरज भासल्यास लिलाव हा १३ फेब्रुवारीलाही पुढे सुरु राहू शकतो. सहाव्या सीझनमध्ये स्पॉट फिक्सिंगमुळे आयपीएलची प्रतिमा आणखी मलिन झाली. त्यामुळे बीसीसीआयकडून लिलावाच्या प्रक्रियेत चार बदल करण्यात आले आहेत.

आयपीएल’च्या सातव्या सीझनसाठी २०१४ च्या लिलावासाठी फ्रेंचायझींची सॅलरी कॅप असणार आहे ती ६० कोटी रुपयांची सीझन सातसाठी असणार आहेत एकूण आठ टीम्स. ४८० कोटी रुपये खर्च करून क्रिकेटर्स खरेदी केले जाणार आहेत. या सीझनपासून क्रिकेटर्सना डॉलर्सऐवजी भारतीय रुपयांत पैसै दिले जाणार आहेत. आयपीएल गव्हर्निंग काऊंन्सिलच्या नव्या नियमांनुसार फ्रँचायझींना आता आपल्या पूलमध्ये चारऐवजी पाच क्रिकेटपटू ठेवण्याची मुभा असणार आहे. त्यारमुळेच आता आगामी काळात ४८० कोटींचा हा लिलाव रोमांचक ठरणार असल्यारने सर्वांचे याकडे लक्ष लागले आहे.

Leave a Comment