जीएसएलव्ही- डी5′ अग्निबाणाचे यशस्वी प्रक्षेपण

चेन्नई- भारताच्या महत्त्वपूर्ण अशा ‘जीसॅट-14’ या उपग्रहाचे प्रक्षेपण करणाऱ्या ‘जीएसएलव्ही- डी5’ अग्निबाणाचे यशस्वी प्रक्षेपण आज (रविवार) श्रीहरीकोट्टा येथील भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) सतीश धवन अवकाश केंद्रावरून तळावरून झाले. ‘जीएसएलव्ही- डी5’मध्ये वरील स्तरात भारतीय बनावटीचे निम्नताप यंत्र वापरण्यात आले आहे.

दूर-शिक्षण आणि दूर-वैद्यक या क्षेत्रांतील ऍप्लिकेशन असलेला जीसॅट-14 हा संज्ञापन उपग्रह (कम्युनिकेशन सॅटेलाइट) आहे. या उपग्रहासह हा अवजड अग्निबाण प्रक्षेपित करण्याचे मागील तीन वर्षांत दोन प्रयत्न अयशस्वी झाले, तर एकदा ही मोहीम रद्द करण्यात आली होती. तथापि, यावेळी हे प्रक्षेपण यशस्वी होईल असा विश्वास इस्रोच्या वैज्ञानिकांनी व्यक्त केला होता .