व्यसन ठरते मानसिक आजाराचे कारण

वॉशिंग्टन- सेंट लुईसमधील वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिन आणि युनिव्हर्सिटी ऑफ साऊदर्न कॅलिफोर्नियातील संशोधकांनी हे संशोधन केले. मनोविकृत व व्यसनाधीन असलेल्या व्यक्तींचे या संशोधनातून मूल्यांकन करण्यात आले. या संशोधनातून व्यसनमुक्त असलेल्या तरुणांपेक्षा व्यसनाच्या अधीनतेमुळे मानसिकदृष्टया आजारी असलेल्या तरुणांच्या मृत्यूची शक्यता अधिक असल्याचे दिसून आले.

यामध्ये प्रामुख्याने १२ ते २५ वयोगटातील तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसून आल्याचे वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीचे मनोविकार विभागाचे साहाय्यक प्राध्यापक सराह एम हार्ट्झ यांनी सांगितले. मृत झालेल्या या तरुणांची ड्रग्जच्या अतिरिक्त सेवनाने किंवा आत्महत्या करून मरण्याची अजिबात इच्छा नव्हती. पण ते करीत असलेल्या दारू आणि तंबाखूच्या अतिरिक्त सेवनामुळे त्यांना हृदयविकार आणि कर्करोग होऊन त्यांचा मृत्यू झाल्याचे हार्ट्झ यांनी सांगितले.

या संशोधनामध्ये धूम्रपान, दारू आणि ड्रग्जचे सेवन करणा-या जवळपास २० हजार लोकांचे निरीक्षण केले. यातील नऊ हजार १४२ जण हे स्क्रिझोफ्रेनिया, स्क्रिझोअफेक्टिव्ह, भ्रांती, भ्रम आणि तणाव यांसारख्या आजाराने ग्रस्त असल्याचे दिसून आले.

मानसिकदृष्टया आजारी नसलेल्या पण दारू व तंबाखूसारख्या मादक द्रव्यांचे सेवन करणा-या जवळपास १० हजार सुदृढ लोकांचेही या संशोधनात मूल्यमापन करण्यात आले. यामध्ये त्यांना एका वेळी चार पेग दारूचे पिणा-यांमध्ये काही मानसिक आजार आढळून आले.

तर दररोज सिगारेट ओढणा-या व्यक्तींमध्ये ७५ टक्के लोक मानसिकदृष्टया आजारी असल्याचे दिसून आले. हे संशोधन ‘जामा सायक्रॅट्रिक’ या जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment