पत्रकारितेची दिव्य परंपरा

महाराष्ट्रात आज दर्पण दिन साजरा होत आहे. मराठीतले पहिले पाक्षिक वृत्तपत्र दर्पण याचा हा स्थापना दिवस. १८२ वर्षापूर्वी अतीशय प्रतिकूल वातावरणात बाळशास्त्री जांभेकर या प्रकांड पंडिताने या पाक्षिकाची सुरूवात केली. समाजामध्ये शिक्षित लोकांची संख्या हाताच्या बोटावर मोजता येईल एवढीही नसताना आणि परकियांच्या पारतंत्र्याच्या बेड्यात अडकलेला असताना समाजाला ज्ञानदान करणारी ही दिवटी बाळशास्त्री जांभेकर यांनी पेटविली. समाजातला अज्ञानाचा अंधःकार नाहीसा व्हावा आणि ज्ञानाचा प्रकाश पडून समाजाची वाटचाल सुरळीतपणे व्हावी यासाठी हा आटापिटा बाळशास्त्रींनी केला होता. १८३२ साली देश पारतंत्र्यात असला तरी स्वातंत्र्य प्राप्तीच्या लढ्याच्या प्रेरणा अजून निर्माण झालेल्या नव्हत्या. मात्र आपल्या देशावर राज्य करणारे ब्रिटिश लोक मुठभर असूनसुध्दा आपल्यावर कसे राज्य करू शकतात. अशा प्रश्‍नाने समाजातले काही लोक अस्वस्थ झाले होते. न्यायमूर्ती रानडे, आगरकर, महात्मा जोतीबा ङ्गुले यांच्या विचार जागृतीच्या कार्याची अजून सुरूवात झालेली नव्हती. परंतु त्यांच्या आधीच्या पिढीतील बाळशास्त्रीसारख्या विद्वान लोकांच्या मनात आपल्या समाज स्थितीच्या पुनराव लोकनाची सुरूवात झालेली होती.

ज्या काळात बाळशास्त्री जांभेकर महाराष्ट्रात होऊन गेले त्याचकाळात बंगालमध्ये राजा राममोहन रॉय यांनी समाजकार्याची सुरूवात केली होती. आपल्या धर्मात ज्या रूढी पाळल्या जातात त्या कालसुसंगत आहेत की नाही हे आपण पाहिले पाहिजे अशी अंतःप्रेरणा जागी होण्याचा तो काळ होता. त्याच कालावधीला भारतामध्ये भारतीय प्रबोधन युगाची पहाट असे म्हटले जाते. त्या पहाटेच्या प्रकाशाचा दूत म्हणून समाजाची स्थिती त्याला दाखवणारा हा दर्पण नावाचा आरसा बाळशास्त्रींनी सुरू केला होता. आपल्या देशाची प्रगती का होत नाही असा प्रश्‍न विचारून बाळशास्त्रींनी स्वतःच्या पुरता एक शोध लावला होता. त्यांच्या मते भारतीय लोक धर्मशास्त्र, अध्यात्म, ज्योतिष, आयुर्वेद या शास्त्रांमध्ये पारंगत आहेत. परंतु रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र अशा उपयोजित शास्त्रामध्ये आपण मागे होतो. तेव्हा उपयोजित शास्त्रांची माहिती समाजाला देऊन त्याला ज्ञानप्रवण केले पाहिजे असे त्यांना वाटत असे. याच प्रेरणेतून त्यांनी दर्पण हे वृत्तपत्र सुरू केले होते. सुरूवातीच्या काळात हे वृत्तपत्र पंधरा दिवसाला एकदा प्रसिध्द होत असे आणि ते दोन भाषांमध्ये छापलेले असे. एकंदरीत ही मराठी पत्रसृष्टीची सुरूवात ङ्गार लहान होती. आज तिला गंगेचे रूप आले आहे.

बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे वृत्तपत्र सुरू केले तेव्हा ते अवघे २० वर्षांचे होते. ते वयाच्या १९ व्या वर्षी प्राध्यापक आणि शिक्षणाधिकारी झाले होते. त्यांनी समाजसुधारक म्हणून सतीची चाल, बालविवाह, स्त्री भू्रण हत्या, मुलींची विक्री अशा समाजातल्या अंधश्रध्दांच्या विरुध्द या कालबाह्य रूढींच्या विरोधात बरेच जनजागरण केले होते. त्यांना चौदां भाषा येत होत्या. एवढ्या विद्वान व्यक्तीने मराठीतले पहिले वृत्तपत्र काढलेले आहे. याचा प्रत्येक मराठी माणसाला अभिमान वाटला पाहिजे. पत्रकाराला समाजाचा वॉच डॉग म्हणतात. म्हणजे एखाद्या घरामध्ये अनोळखी व्यक्तीने शिरू नये यासाठी दारात कुत्र्याचा जागता पहारा असतो तसा समाजावर पत्रकारांचा पहारा असला पाहिजे. समाजात शिरू पाहणार्‍या दुष्ट प्रवृत्तींना प्रवेश घेण्यास मज्जाव करणे हे पत्रकारांचे काम असले पाहिजे. म्हणूनच त्यांना वॉच डॉग म्हणतात. आजच्या पत्रकारांनी पत्रकार दिनाच्या निमित्ताने काही चिंतन करताना आपण समाजाचा वॉच डॉग म्हणून काही काम करतो का याचा विचार केला पाहिजे. त्याचबरोबर बाळशास्त्री जांभेकर यांनी आपल्या वृत्तपत्राचे नाव दर्पण का ठेवले असावे याचाही विचार प्रत्येक पत्रकारांनी केला पाहिजे. दर्पण म्हणजे आरसा. आरशामध्ये माणसाचे प्रतिबिंब जशास तसे दिसत असते. तसे वृत्तपत्रामध्ये समाजाचे प्रतिबिंब उमटले पाहिजे असा बाळशास्त्रींचा वृत्तपत्राचे नाव दर्पण ठेवण्यामागचा हेतू होता.

पत्रकाराने आपण वॉच डॉग आहोत की नाही हे बघत असतानाच आपण आपल्या वृत्तपत्रातून समाजाची जी छबी उमटवत असतो. ती आरशात उमटल्यासारखी जशास तशी असते की नाही हेही पाहिले पाहिजे. आजच्या काळात पत्रकार ङ्गार बेजबाबदार झाले आहेत. असे जुन्या पत्रकारांना वाटते. पण याही पूर्वीच्या पिढीमध्ये असेच म्हटले जात होते. शेवटी काळाचा महिमा अगम्य असतो. काळ बदलेल तसे सर्व क्षेत्रामध्ये बदल घडत असतात. जुन्या पिढीला नव्या पिढीतले बदल मानवत नाहीत. त्यामुळे जुनी पिढी नेहमीच नव्या पिढीच्या नावाने बोटे मोडत असते. तेव्हा आजचे पत्रकार बेजबाबदार झाले आहेत असे कोणी म्हणत असेल तर पूर्वीचे पत्रकार ङ्गार जबाबदारीने काम करत होते हे त्यांना दाखवून द्यावे लागेल. मात्र पूर्वीची पत्रकारिता ङ्गार छान होती आणि आताची पत्रकारिता ढासळलेली आहे असे काही दिसत नाही. पत्रकारिता कालची असो की आजची असो त्या दोन्हीमध्ये जशा काही दुष्ट प्रवृत्ती आहेत तशाच चांगल्या प्रवृत्तीही आहेत. मात्र आजच्या पत्रकारितेमध्ये तंत्रशास्त्रदृष्ट्या ङ्गार बदल झाले आहेत. बातम्यांचा ताजेपणा, मांडणी, त्याचबरोबर सजावट, किंमती या सर्वांवर नव्या तंत्रज्ञानाची मोठी छाप आहे. त्यामुळे पत्रकारितेचे बाह्य रंग पार बदलून गेलेले आहे. परंतु वृत्तपत्रांचा हेतू म्हणजे समाजजागृती हे त्यांचे अंतरंग बदलून चालणार नाही.

Leave a Comment