दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांचं लायसन्स रद्द करा – मुख्यमंत्री

मुंबई – दारू पिऊन वाहन हाकणाऱ्यांचे परवाने रद्द केले पाहिजे, असं राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे. फक्त दंड वसून करून हे प्रकार थांबणार नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. कुणालाही सहज लायसन्स दिले जाते, हे लायसन्स म्हणजे किलिंग लायसन्स आहे, असं यावेळी गृहमंत्री आर आर पाटील यांनी म्हटलं आहे. महामार्ग पोलिसांच्या रस्ता सुरक्षा अभियानाचा शुभारंभ मुंबईत सह्याद्री अतिथी गृहावर करण्यात आला, यावेळी गृहराज्यमंत्री सतेज पाटीलही उपस्थित होते.

दारू पिऊन वाहने चालविणार्‍यांकडून केवळ दंड वसूल करून भागणार नाही, त्यांचे परवानेच रद्द केले पाहिजेत, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शुक्रवारी सांगितले. ऊठसूठ कुणालाही ड्रायव्हिंग लायसन्स आपल्याकडे दिले जाते. माळशेज घाटात गुरूवारी झालेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी दोन अथवा पाच अपघात करणाऱ्या एसटी चालकाला बडतर्फ करावं, अथवा त्याला इतर काम देण्यात यावं असा सल्लाही यावेळी दिला.

तसेच रस्ते सुरक्षेचा विषय शाळा आणि महाविद्यालयाच्या अभ्यासक्रमात अनिवार्य करण्याची गरज असल्याचंही यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. तसेच ड्रंक ऍण्ड ड्राईव्हवर दंड वसुलीनंतर पुढील कारवाई होत नसल्याने या प्रकरणांना आळा बसत नसल्याची खंतही यावेळी मुख्यमंत्र्यांनी, गृहमंत्री आर.आर.पाटील यांच्या उपस्थितीत बोलून दाखवली.

Leave a Comment