डायलिसीसचे नवे तंत्रज्ञान

किेडनीचा विकार जडलेल्या माणसाच्या ँशरीरातली शुद्धीकरण यंत्रणा निकामी झाली की त्याच्यासमोर अनेक समस्या उभ्या राहतात. रक्त शुद्धीकरणाची प्रक्रिया बंद पडते. अशावेळी त्याला डायलिसीसवर ठेवले जाते आणि कृत्रिमरित्या रक्ताचा पुरवठा केला जातो. ही गोष्ट आता सर्वांनाच माहीत झालेली आहे. परंतु सध्या ज्या पद्धतीची डायलिसीस यंत्रणा वापरली जात आहे तिच्यामध्ये काही दोष आहेत. त्यामुळे डायलिसीसची पद्धत बदलता येईल का? यावर बर्‍याच दिवसांपासून संशोधन सुरू होते. त्यातून मोअर थरो डायलिसीस ही नवी प्रणाली विकसित झाली आहे. प्रचलित डायलिसीसच्या पद्धतीमध्ये असलेले सगळेच दोष काही काढता येणार नाही. मात्र या डायलिसीसमध्ये हृदयविकार बळावण्याची शक्यता असते. ती शक्यता नव्या डायलिसीस पद्धतीमुळे कमी झाली आहे.

डायलिसीसचा वारंवार वापर केल्यास असे रुग्ण पुढे हृदयविकाराने दगावतात, असे बर्‍याच वर्षांपासून लक्षात आले होते. यामागची कारणे शोधली असता असे लक्षात आले की, प्रचलित पद्धतीमध्ये रक्तातील लहान लहान अशुद्ध घटक परिणामकारकपणे काढले जातात. परंतु रक्तातील कोलेस्टेरॉल पूर्णपणे हटवले जात नाही. त्यामुळे रक्तातल्या कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढत जाते. किडनी निकामी झालेली असल्यामुळे ते आपोआपही काढले जात नाही. परिणामी साचत राहते आणि रुग्ण शेवटी हृदयविकार होऊन मरण पावतो.

सध्या नव्याने प्रचलित होत असलेल्या मोअर थरो डायलिसीस या पद्धतीमध्ये रक्तातील कोलेस्टेरॉल मोठ्या प्रमाणावर हटवले जाते आणि प्रचलित पद्धतीतला हा एक दोष निवारण केला जातो. प्रचलित पद्धतीमध्ये काही विशिष्ट प्रकारचे संसर्गही रक्तात राहतात. तेही नव्या पद्धतीत निवारण होतात. गेल्या वर्षभरापासून या नव्या पद्धतीला लागणारी उपकरणे अमेरिकेत विक्रीला आलेली आहेत आणि त्यांचा वापर केला जात आहे. मात्र एकाच वर्षात त्याच्या वापराचे प्रमाण वाढले आहे. सध्या अमेरिका या एकाच देशामध्ये ३ लाख ५० हजार लोक डायलिसीसवर जगत आहेत. या लोकांना डायलिसीसमुळे काही प्रमाणात दिलासा मिळत असला तरी त्यांना त्यातल्या दोषांचा ङ्गटका बसत असतोच. नव्या पद्धतीमुळे मात्र या दोषांचे निवारण होणार आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment