ऑस्ट्रेलियाने दिला इंग्लंडला व्हाईटवॉश

सिडनी: प्रतिष्ठेच्या समजल्या जाणा-या पाच कसोटी सामन्यााच्या अॅशेस मालिकेत ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला व्हाईटवॉश दिला आहे. शेवटच्या कसोटीत २८१ धावांनी विजय मिळवताना कांगारुंनी या मालिकेत ५-० असा इंगलंडचा धूव्वाण उडविला आहे. शेवटच्या कसोटीत भेदक गोलंदाजी करणा-या ऑस्ट्रेलियाच्या रायन हॅरिसला ‘मॅन ऑफ द मॅचचा’ किताब देण्यात आला. हॅरिसने दोन्ही डावात दहा फलंदाजांना बाद केले.

त्याासोबतच या मालिकेत धडाकेबाज कामगिरी बजावणारा ऑस्ट्रेलियाचा मिचेल जॉन्सन ‘मॅन ऑफ द सिरीजचा’ मानकरी ठरला. सिडनी कसोटीत ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात सर्वबाद ३२६ धावा केल्या होत्या. यामध्ये स्टीव्हन स्मिथच्या सर्वाधिक ११५ धावांचा समावेश होता. तर इंग्लंडकडून बेन स्टोक्सने भेदक मारा करत कांगारुंचे सहा फलंदाज बाद केले.

त्यांनतर फलंदाजीसाठी उतरलेल्या इंग्लंडचा पहिला डाव, ऑस्ट्रेलियाने अवघ्या १५५ धावात गुंड़ाळला. ऑस्ट्रेलियाचा वेगवान मा-यासमोर इंग्लंडचे फलंदाज तग धरू शकले नाहीत. त्यामुळे पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाला १७० धावांची आघाडी मिळाली होती. त्यानंतर ऑस्‍ट्रेलियाने धावाचा डोंगर उभारला होता. या धावाचा पाठलाग करणे इंगलंडला शक्य झाले नाही. त्यामुळे शेवटच्या कसोटीत २८१ धावांनी विजय मिळवताना कांगारुंनी या मालिकेत ५-० असा इंगलंडचा धूव्वा उडविला आहे.