सोनू निगमवर नागपुरात गुन्हा दाखल

नागपूर: बॉलीवूडमधील प्रसिद्ध गायक सोनू निगम त्यारच्याळ कार्यक्रमासाठी परवानगी न घेतल्याने अडचणीत आला आहे. त्याने नागपूर येथे विनापरवाना कार्यक्रम केल्याने सोनू निगमवर, नागपुरात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानमुळे हे प्रकरण आता आगामी काळात सोनू निगमला चांगलेच शेकणार असे दिसत आहे.

नागपूर येथे बॉलीवूडमधील प्रसिद्ध गायक सोनू निगमचा लाईव्ह इन कन्सर्ट हा कार्यक्रम बिशप कॉटन स्कूलच्या प्रांगणात भरवला होता. पण या कार्यक्रमासाठी परवानगी न घेतल्याने मुंबई पोलीस कायद्याअंतर्गत सोनू निगमवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी पोलिसरंनी कार्यक्रमाच्या आयोजक गिरीजा धर्माधिकारी आणि शाळेच्या मुख्यध्यापकांवरही गुन्हा नोंदवला आहे. या सर्व प्रकारामुळे खळबळ माजली आहे. त्यामुळे हे प्रकरण आता आगामी काळात सोनू निगमला चांगलेच शेकणार असे दिसत आहे.

Leave a Comment