फ्रान्समध्ये लठ्ठ मुलींना नोकरी मिळण्यात अडचण

पॅरिस – फ्रान्समधील मुली लहानवयापासूनच आहारतज्ञ आणि फिजिकल ट्रेनरची मदत वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी घेऊ लागल्या असून त्यामागचे कारणही मोठे मजेशीर आहे. खासगी क्षेत्रातील कंपन्या जाड मुलींना नोकरी देत नाहीत. विशेष म्हणजे जाड मुली कितीही हुशार, स्मार्ट आणि कार्यक्षम असल्या तरीही तुमचे वजन जास्त असल्याने आम्ही तुम्हाला नोकरी देऊ शकत नाही असे कंपन्या स्पष्टपणे सांगतात.

या संबंधी नुकतेच एक सर्वेक्षण केले गेले आहे आणि त्यात असे आढळले आहे की अनेक शहरात मुलींची जाडी ही नोकरीच्या आड येत आहे. याउलट फिगर चांगली असेल तर नोकरी मिळण्यात कोणतीच अडचण येत नाही. याचा परिणाम असा झाला आहे की शालेय वयापासूनच मुली वजन वाढू नये याची काळजी घेऊ लागल्या आहेत. त्यासाठी फिजिकल ट्रेनर आणि आहारतज्ञांची ट्रीटमेंट घेत आहेत.विशेष म्हणजे हा सारा उपद्व्याप पालकांचा संमतीने केला जातो.

तज्ञ फिजिकल ट्रेनर याविषयी सांगतात की फ्रान्समध्ये स्लीम अॅन्ड ट्रिम राहण्याचे कल्चर प्रचंड लोकप्रिय आहे. हेच कल्चर ऑफिसांतूनही रूळले आहे. त्यातून ज्या मुलींना आपल्या ऑफिससाठी प्रतिनिधित्व करायचे असेल अथवा पब्लीक रिलेशनसाठी काम करायचे असेल तर त्यांना स्लीम असणे आवश्यकच ठरते व यातूनच बारीक राहण्याचे फॅड वाढू लागले आहे.

Leave a Comment