झहीरच्या आगमनाने मुंबईचे बळ वाढले

मुंबई – नुकत्याच झालेल्या दक्षिण अपिफ्रका विरूद़धच्या मालिकेत कसोटी बळींचे त्रिशतक साजरे करणारा तेज गोलंदाज झहीर खान महाराष्ट्राविरूध्दच्या रणजी उपांत्यपूर्व लढतीत मुंबईचे नेतृत्व करणार आहे. त्याामुळे आगामी काळात मुंबईच्या पाठिराख्यांना बळ मिळाले आहे. त्याचमुळे आता मुंबईचे पारडे जड झाले आहे

या मोसमात आदित्य तरे, वसीमपाठोपाठ सर्वाधिक धावा करणा-या हिकेन शहाला बोटाच्या दुखापतीमुळे विश्रांती देण्यात आली आहे. त्याच्याऐवजी विनीत इंदुलकरची निवड करण्यात आली आहे. फीट असलेला अभिषेक नायर संघात परतला आहे. ४२ वर्षीय लेगस्पिनर प्रविण तांबे, मनीष राव, बलविंदर सिंग संधू यांना वगळण्यात आले असून त्याऐवजी निखील पाटील ज्युनियर, सर्वेश दामले यांचा समावेश करण्यात आला आहे.

मुंबईचा संघः झहीर खान (कर्णधार), वसीम जाफर, अभिषेक नायर, आदित्य तरे, कौस्तुभ पवार, सूर्यकुमार यादव,विनीत इंदुलकर, निखील पाटील ज्युनियर सर्वेश दामले, विशाल दाभोळकर, जावेद खान, शार्दुल ठाकूर, सागर केरकर, इक्बाल अब्दुल्ला, सौरव नेत्रावळकर.

Leave a Comment