मंगळावरील उल्केचे तुकडे बसविलेले घड्याळ

स्विस लक्झरी वॉच उत्पादन कंपनी लुईस मोईनेट ने नवीन लिमिटेड एडिशन घड्याळ लाँच केले असून त्याची किंमत आहे तब्बल १ कोटी ८० लाख रूपये. या एडिशनमध्ये फक्त १२ घड्याळे बनविली गेली आहेत.

या घड्याळाची डायल हाताने बनविली गेली आहे. या घड्याळात मंगळावरील उल्केचे तुकडे बसविले गेले असून ज्या उल्कापिंडाचे ते तुकडे आहेत तो जिद्दा हरासिस नावाचा उल्कापिंड १८ कोटी वर्षांपूर्वीचा आहे असे समजते. परिणामी हा उल्कापिंड खूपच दुर्मिळ आहे आणि या उक्लापिंडाच्या १ ग्रॅम तुकड्याची किंमत ७० जहार रूपयांच्या घरात आहे. या शिवाय या घड्याळात ३.४६ कॅरटचे हिरेही जडविले गेले आहेत. घड्याळाची केस १८ कॅरेट व्हाईट गोल्ड पासून बनविली गेली आहे.

अॅस्ट्रोलॅब बनविणार्‍या अहमद अल सराज याच्यापासून प्रेरणा घेऊन हे घड्याळ बनविले गेल्याचे सांगितले जात आहे. अॅस्ट्रोलॅब हे जगातील सर्वात जुने खगोलिय उपकरण मानले जाते. मात्र त्याविषयी फारच थोड्या लोकांना माहिती आहे.