लॅपटॉप सुरक्षित ठेवा चमकदार नेलपॉलिशने

आपले लॅपटॉप अथवा अन्य तत्सम उपकरणे आपल्या गैरहजेरीत कोणी हाताळते का हे आता अगदी सोप्या उपायाने सहज समजू शकणार आहे. लॅपटॉप अथवा संगणकातील आपली गुप्त माहिती सुरक्षित राहावी म्हणून पासवर्ड, ड्राइव्ह इनक्रिप्शन अथवा तशी सॉफ्टवेअर वापरली जातात मात्र आपली असली उपकरणे प्रत्यक्ष हाताळली जाणे ही जगातील वाढती समस्या होऊ पाहते आहे. आणि त्यावर चमकदार नेलपॉलिशचा उपयोग संशोधक इरिक आणि रायन यांनी सचविला आहे.

या संशोधकांच्या मते आपले लॅपटॉप दुसर्‍यांनी हाताळू नयेत म्हणून अनेकजण टॅपर प्रूफ सील अथवा पोर्टवर स्कू बसविणे असे उपाय करतात मात्र ते तितकेसे सुरक्षित नाहीत. ही सील अथवा स्कू थोडेसे प्रशिक्षण असेल तर सहज उघडता येतात. त्याऐवजी पोर्टवर चमकदार नेल पॉलिश लावले तर त्याचे जे सील तयार होते ते कॉपी करता येत नाही, अथवा तोडताही येत नाही असे संशोधनात आढळले आहे.

तज्ञांच्या मते असे नेलपॉलिश पोर्टवर लावल्यानंतर युजरने स्मार्टफोनच्या सहाय्याने लॅपटॉपचा फोटो काढावा आणि परत लॅपटॉप वापरायची वेळ येईल तेव्हा पुन्हा फोटो काढावा. तुमचा लॅपटॉप हाताळायचा कुणी प्रयत्न केला असेल तर या दोन फोटोंवरून तुम्ही ते ओळखू शकता. लॅपटॉप हाताळला गेला असेल तर नेलपॉलिशच्या चमकदारपणात वेगळेपणा दिसतो तसेच स्कू्ची पोझिशन किचित बदलली असेल तरी ते समजू शकते. रात्रीच्या अंधारात आकाशात होत असलेले बारीकसे बदल लक्षात येण्यासाठी खगोलतज्ञ असेच ब्लिक तंत्रज्ञान वापरत असतात.

Leave a Comment