रूपयाच्या नवीन चिन्हासह येणार ५०० च्या नोटा

मुंबई – रिझर्व्ह बँक  रूपयाच्या नव्या चिन्हांसह आणि गव्हर्नर रघुराम राजन यांच्या सहीसह असलेल्या महात्मा गांधी सिरीज २००५ मधील ५०० रूपयांच्या नोटांची छपाई करत असून या नोटा लवकरच चलनात येणार आहेत. यामध्ये रूपयाचे चिन्ह नोटेच्या मागेपुढे छापले जात असून त्यामध्ये आर हे अक्षरही असेल तसेच त्यावर २०१३ हे वर्ष प्रिटींगचे वर्ष असेल असे सांगितले गेले आहे.

या नोटेचे डिझाईन मागच्या नोटांप्रमाणेच आहे तसेच या नोटा चलनात आल्यानंतरही पूर्वीच्या ५०० रूपयांचा नोटा चलनात राहणार आहेत असाही खुलासा केला गेला आहे.