ऑस्ट्रेलियाला भारतीय पर्यटकांची पसंती

मेलबर्न -ऑस्ट्रेलियाला भारतीय पर्यटक अधिक पसंती देत असून जानेवारी ते आक्टोबर २०१३ या काळात तब्बल १ लाख ३४ हजार भारतीय पर्यटकांनी ऑस्ट्रेलियाला भेट दिली असल्याचे ऑस्ट्रेलियाच्या पर्यटन विभागाने जाहीर केले आहे. गतवर्षाच्या तुलनेत पर्यटकांच्या संख्येत ९.५ टक्कयांनी वाढ झाली आहे. तसेच पर्यटन विभागाच्या अंदाजानुसार पुढील वर्षात किमान १ लाख ७६ हजार भारतीय पर्यटक ऑस्ट्रेलियाला भेट देतील.
australia

(फोटो सौजन्य – Global Blue)
जगभरात विविध देशांच्या पर्यटक आकडेवारीनुसार चीनला भेट देणार्‍या पर्यटकांच्या संख्येत १५.९, मलेशिया १३.९, सिंगापूर १२.५ तर भारत ७.५ टक्के वाढ नोंदविली गेली आहे. इतकेच नव्हे तर पर्यटकांचे हॉटेल्स, रिर्झार्ट, मोटेल्स , गेस्ट हाऊस, सर्व्हिस अपार्टमेंट येथील वास्तव्यांचे दिवसही वाढत चालले असून त्यात १७.२ टक्के वाढ झाली आहे.

australia2

प्रवासी पर्यटनादरम्यान करत असलेले खर्चही वाढते आहेत. गतवर्षात पर्यटकांच्या खर्चाचा आकडा ८६७ दशलक्ष डॉलर्स इतका होता तो २०२१-२२ सालापर्यंत २ अब्ज डॉलर्सवर जाण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.
australia1
गेल्या वर्षीच ऑस्ट्रेलियाच्या पर्यटन विभागाने भारतीय पर्यटकांची संख्या वाढावी यासाठी इंडिया २०२० हा प्लॅन सादर केला असून त्याला चांगले यश मिळताना दिसत आहे.

Leave a Comment