राहुल गांधींचे डस्टबीन

राजकारणात माणसे वापरून ङ्गेकली पाहिजेत असे समजले जाते. कारण वापरलेली माणसे योग्य वेळी ङ्गेकून दिली नाहीत तर तीच माणसे आपल्या पेक्षा वरचढ होऊन आपल्याला ङ्गेकून देण्याची शक्यता असते. म्हणून यशस्वी राजकारणी नेत्यांचे डस्टबीन ङ्गार भरलेले असते. प्रदीर्घ काळच्या राजकारणामध्ये त्यांचे नजीकचे सहकारी, उजवे हात, डावे हात, विश्‍वसनीय सहयोगी, वसूलदार इत्यादी असलेले अनेक लोक त्या डस्टबीनमध्ये पडलेले दिसतात. परंतु डस्टबीनचे धोरण राबवणारा हा नेता ङ्गार धुरंधर असावा लागतो. तसा तो नसेल तर त्याने डस्टबीनमध्ये टाकलेलीच माणसेच त्याचा घात करतात. सध्या राहुल गांधी यांनी आपली स्वच्छ प्रतिमा निर्माण करण्यासाठी डस्टबीन धोरण राबवायला सुरूवात केली आहे. परंतु त्यांच्या या धोरणामुळे कॉंग्रेस पक्षात मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे. गांधी नेहरु घराण्याचा वारसा असल्यामुळे राहुल गांधींना कॉंग्रेसमध्ये आपसूकच अधिकार मिळाले आहेत. परंतु डस्टबीनमध्ये टाकलेले नेते त्यांच्याविरुध्द बंड करतील तेव्हा त्यातून निर्माण होणारे वादळ कसे हाताळावे एवढी मुत्सद्देगिरी राहुल गांधींत नाहीत आणि ती नसतानाही ते आपल्या मर्यादेपेक्षाही अधिक आक्रमक होऊन इतरांच्या प्रतिमा खराब करून स्वतःची प्रतिमा सुधरायला लागले आहेत.

२०१४ सालची लोकसभेची निवडणूक जसजशी जवळ येत चालली आहे तसतसे कोणते डावपेच लढवून ती निवडणूक जिंकता येईल याच्याबाबतीत राहुल गांधींचे नजिकचे सल्लागार घिसाडघाईने काही विचित्र धोरणे आखायला लागले आहेत आणि बावचळून गेल्यागत वागायला लागले आहेत. महाराष्ट्रात गाजलेल्या आदर्श गृहनिर्माण घोटाळ्यांच्या बाबतीत राहुल गांधींची वाटचाल अशीच अपरिपक्वपणाची ठरली आहे. हिमाचल प्रदेशाचे मुख्यमंत्री वीरभद्रसिंग आणि कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिध्दरामय्या या दोन मुख्यमंत्र्यांच्याबाबतीत कॉंग्रेस पक्ष घेत असलेले निर्णय अशाच हालचालींचे नमुने आहेत. वीरभद्रसिंग हे केंद्रात पोलाद मंत्री होते. ते एवढे अतीशहाणे आहेत की त्यांनी एका पोलाद प्रकल्पाला परवानगी देण्यासाठी अडीच कोटींची लाच घेतली पण त्या कंपनीने मंत्र्यांना दिलेली ही लाच आपल्या हिशोबात नोंदली. एवढा ढळढळीत पुरावा समोर आल्यावर विरोध पक्ष काय गप्प बसणार आहेत का? त्यांनी गोंधळ घातला आणि वीरभद्रसिंहांची पोलाद मंत्रीपदावर उचल बांगडी करण्यात आली. जो माणूस भ्रष्ट असल्यामुळे केंद्रातला मंत्री होऊ शकत नाही तोच माणूस राज्याचा मुख्यमंत्री कसा काय होऊ शकतो असा कोणीही सामान्य बुध्दीचा माणूस विचारील. पण असा प्रश्‍न सोनिया गांधींच्या डोक्यात आला नाही.

भ्रष्टाचारामुळे मंत्रीपदावरून काढलेल्या वीरभद्रासिंगांना त्यांनी हिमाचल प्रदशाचे मुख्यमंत्री केले. आता भाजपा नेते अरुण जेटली यांनी सीबीआयकडे अर्ज केला आहे. सीबीआयने हे प्रकरण गंभीरपणे घेतले आहे. ही गोष्ट समजताच कॉंग्रेस पक्षश्रेष्ठींनी वीरभद्रसिंग यांना मुख्यमंत्री पदावरून हटवण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. अशीच पाळी कुणावरही येऊ शकते. सध्या कॉंग्रेस पक्षाच्या डावपेचाचा केंद्रबिंदू, राहुल गांधींची प्रतिमा हा झाला आहे. राहुल गांधी हे अण्णा हजारे यांच्या पेक्षाही अधिक स्वच्छ नेते आहेत हे सिध्द करण्याचा कॉंग्रेसचा आटापिटा या पक्षाला किती महागात पडणार आहे याची कल्पना या पक्षातल्या सुमार क्षमतेच्या नेत्यांना येईनाशी झाले आहे. राहुल गांधींची प्रतिमा सुधारावी म्हणून कोणाचा बळी देणार आहेत? आता वीरभद्रसिंग यंाच्यावर वेळ आली आहे. त्यांना डच्चू दिला की राहुल गांधी स्वच्छ ठरणार आहेत. महाराष्ट्रात आदर्शवर चर्चा केली की, राहुल गांधी हे भ्रष्टाचाराचे कर्दनकाळ ठरणार आहेत. पण त्यामुळे महाराष्ट्रातल्या पृथ्वीराज चव्हाण यांच्या स्वच्छ प्रतिमेचा बळी द्यावा लागत आहे. वीरभद्रसिंग यांना घरी जावे लागत आहे. या सगळ्या घटनांमुळे कॉंग्रेसच्या नेत्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

आपल्या पक्षाने भ्रष्टाचाराची संस्कृती पोसली, वरपासून खालपर्यंत सर्वांनी खा खा पैसे खाल्ले, ते खाताना कोणत्याही पक्षश्रेष्ठींनी अटकाव केला नाही. त्यामुळे कोणीच काळजी केेली नाही. आजवर सर्वांना सांभाळून घेतले पण आता मोदी आणि अरविंद केजरीवाल यांच्यापेक्षा वरचढ होण्यासाठी राहुल गांधी ह्या सर्वांचे बळी देणार आहेत का असा प्रश्‍न कॉंग्रेसच्या नेत्यांच्या मनात निर्माण व्हायला लागला आहे. सुरूवातीपासूनच कॉंगे्रस पक्ष भ्रष्टाचारापासून मुक्त असता तर राहुल गांधींनी आपल्या प्रतिमेसाठी एखाददुसर्‍या मुख्यमंत्र्यांचा बळी द्यायला हरकत नव्हती. पण जन्मभर भ्रष्टाचार पोसायचा आणि संकट आल्यास ज्यांना पोसले त्यांना पायाखाली घालायचे ही प्रवृत्ती कॉंग्रेसच्या नेत्यांना अस्वस्थ करत आहे. असे सारे भ्रष्ट नेते राहुल गांधींना गुमानपणे असे बळी घेऊ देणार नाहीत. काही तरी हालचाल करतील अंतर्गत घातपात करतील आणि राहुल गांधींना धडा शिकवतील. आज राहुल गांधी कोणाची तरी नक्कल करायची म्हणून अण्णा हजारे होण्याच्या मागे लागले आहेत आणि स्वतःच्या हाताने कॉंग्रेस पक्षाचा खड्डा खोदत आहेत.

Leave a Comment