ऍलर्जी : अल्लाची मर्जी?

काही वर्षांपूर्वी ऍलर्जी हा आरोग्याच्या क्षेत्रातला अज्ञात प्रदेश होता. ती नेमकी कशी होते हे माहीत नव्हते म्हणून तिला अल्लाकी मर्जी असे म्हटले जात होते. पण आता हा विकार आटोक्यात आला आहे. त्याची चांगली माहितीही झाली आहे. ऍलर्जी कशाचीही असू शकते हे समजले आहे. अन्नाची, कुत्र्या-मांजरांची, धुळीची, ङ्गुलाची, सेंटची, सौदर्य प्रसाधनांची, झुरळांची, स्वयंपाकघरातल्या बुरशीची अशी कशाचीही ऍलर्जी असू शकते. त्यावर तात्पुरती का होईना पण उपाय योजना करता येते हेही माहीत झाले ङ्गक्त एखाद्याला कसली ऍलर्जी सतावत असली तर त्यापासून त्याला जन्मभरासाठी मुक्त करता येईल याची खात्री देतात येत नाही. अजून तेवढी प्रगती झालेली नाही. ऍलर्जी ही एक पर्यावरणातल्या काही घटकांना दिलेली प्रतिक्रिया आहे. ही प्रतिक्रिया सामान्य नाही. असामान्य आहे. कारण इंद्रियांत या घटकांचा सामना करता येईल एवढी प्रतिकार शक्ती नसते. ते अती संवेदनशील असतात. त्यामुळे या घटकांचा त्या विशिष्ट अवयवावर जो काही परिणाम होतो तो म्हणजे ऍलर्जी.

आपल्याला ऍलर्जीचे ङ्गार ज्ञान नव्हते पण एखाद्याला एखादी विशिष्ट गोष्ट सहन होत नाही. ती इतरांना सहन होते. त्या विशिष्ट माणसाला इतर कोेणतीही प्रतिकूलता सहन होते पण त्याला त्या विशिष्ट्य गोष्टीचेच वाावडे असते. त्याला त्या गोष्टीचे वावडेच आहे म्हणजे त्यावर आता काही इलाज नाही असे मानले जात असे. आता मात्र या वावड्यावर काही इलाजही सापडलेला आहे कारण त्याची कारणे समजलेली आहेत. काही पथ्ये पाळली की ही ऍलर्जी सहन होते. काही प्रमाणात त्यावर काही औषधेही सापडली आहेत. भारतात सर्वात सामान्यत: आढळणारी ऍलर्जी आहे ती धुळीची. दर पाच हजार लोकांमागे पाच जणांना ही ऍलर्जी असते. असे लोक घर झाडायला काढतात तेव्हा त्यांनी झाडताना नाकाला घट्ट रुमाल बांधला नाही तर झाडणे संपल्यावर त्यांना सटासट शिंका यायला लागतात. घरातले पडदे बरेच दिवस झाले तरी झटकले नसतील आणि ते काम हाती घेतले असेल तर त्यांना त्या झटकण्यानेही त्रास सुरू होतो.

काही लोकांना तर उशांच्या खाली साचलेल्या किरकोळ धुळीनेही त्रास व्हायला लागतो. आपल्या घरात काही जागा कायम ओलसर आणि दमट असतात. त्या जागांवर काही प्रमाणात बुरशी साचलेली असते. अशा बुरशीचीही काही लोकांना ऍलर्जी असते. अंगावर खाज सुटणे, शिंका येणे असे त्रास तर त्यांना सुरू होतातच पण पण त्यावर लवकर इलाज केला नाही तर मात्र दमाही होण्याची शक्यता असते. काही महिलांना सौंदर्यप्रसाधनांची ऍलर्जी असते. वावडे असलेले सौंदर्य प्रसाधन वापरले की त्या भागावर लाल चट्टा पडणे, सूज येणे किंवा तो भाग कोरडा पडणे असे त्रास सुरू होतात. काही वेळा खाजही सुटते. काही लोकांना ङ्गुलांंची ऍलर्जी असते. पण ती खरे तर ङ्गुलांची ऍलर्जी नसून ङ्गुलातल्या परागकणांची ऍलर्जी असते. या ऍलर्जीत शिंका येतातच पण डोकेदुखी आणि घशात खवखव होेणे हे त्यांचे खास वैशिष्ट्य असते.

काही लोकांना पाळीव प्राण्यांची ङ्गार हौस असते. कुत्री ङ्गार पाळली जातात पण काही लोक मांजरे पाळतात. अशा प्राण्यांच्या शरीरातल्या काही प्रथिनांमुळे त्यांना पाळणार्‍या मालकांना त्रास होऊ शकतो. घशात घरघर होणे आणि क्वचित अस्थमा होणे हे या प्रकाराचे परिणाम असतात. काही संंेंट काही लोकांना त्रासदायक ठरतात. त्यांचा सुगंध येताच त्यांना ढास लागते. काही वेळाने डोकेही दुखायला लागते. काही लोकांना त्वचेवर काही डाग दिसायला लागतात. कोणाला अन्नाचीही ऍलर्जी असते. या सगळ्यांवर पूर्व काळजी ङ्गार आवश्यक आहे. एखाद्या व्यक्तीला ऍलर्जीचा ङ्गार त्रास व्हायला लागला तर त्याला आधी शांत करावे. कारण तो घाबरून जातो आणि घाबरल्याने त्रास वाढायला लागतो. अशा रुग्णाच्या घशावर लक्ष ठेवा. तिथे त्रास सुरू झाला की, त्याची वाटचाल गंभीरतेकडे होत असते. त्वचेची आग होत असेल तर थंड पाणी किंवा बर्ङ्ग लावावा.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment