द. सुडानच्या राजधानीतून हजारोंचे पलायन

संयुक्त राष्ट्रे – दक्षिण सुडान या आङ्ग्रिकेतल्या देशात मोठ्या प्रमाणावर वांशिक दंगली सुरू असून बोट या शहरातून हत्याकांडाच्या भीतीतून हजारो लोकांनी पलायन केले आहे. या देशाचे राष्ट्रपती सल्वा कीर आणि माजी उपराष्ट्रपती रीक मचार या दोघांतल्या संघर्षातून हे हत्याकांड जारी आहे. या संघर्षातून आजवर एक हजार लोक मारले गेले आहेत.

बीट यांच्या काही पाठीराख्यांनी त्यांची साथ सोडून रीक मचार यांचा पक्ष घेतल्यामुळे कीर यांचे पाठीराखे संतप्त झाले असून त्यांनी या पक्षांतर करणार्‍यांचे शिरकाण सुरू केले आहे. या संहारावर नियंत्रण ठेवण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी या तरुणांना आश्रय दिला आहे. पण तरीही सुरक्षित राहण्याची शाश्‍वती नसल्यामुळे हे तरुण पलायन करीत आहेत.

संयुक्त राष्ट्रांच्या छावण्यांत गेल्या आठवड्यात १७ हजार लोक होते, पण आता केवळ ८ हजार लोक राहिले आहेत. ९ हजार लोकांनी सुरक्षित ठिकाणी पलायन केले आहे. या देशात अशाच घटनांत १९९१ साली २ हजार लोक मारले गेले होते.