>नवी दिल्ली – भारतातील विविध शहरात बॉम्बस्फोट घडवणा-या इंडियन मुजाहिदीनने सूरतमध्ये अणूबॉम्बचा स्फोट घडवण्याची योजना आखली होती. इंडियन मुजाहिदीनचा भारतातील प्रमुख अहमद झरार सिद्दिबाप्पा उर्फ यासिन भटकळच्या चौकशीतून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.

यासिन भटकळला भारतीय तपास यंत्रणेने २७ ऑगस्टला नेपाळमधील पोखरा येथून अटक केली. तेव्हापासून एनआयए, भारतीय गुप्तचर यंत्रणांकडून त्याची चौकशी सुरु आहे. यासिन भटकळने पाकिस्तानात असलेला इंडियन मुजाहिदीनचा मोहोरक्या रियाझ भटकळला फोन करुन, छोटय़ा अणूबॉम्बची व्यवस्था होऊ शकते का ? असे विचारले. त्यावर रियाझने पाकिस्तानात सगळयाची व्यवस्था होऊ शकते असे उत्तर दिले.
आम्ही सूरतवर अणूबॉम्ब टाकणार होतो त्यासाठी रियाझ अणूबॉम्बची व्यवस्था करणार होता अशी धक्कादायक कबूली यासिन भटकळने दिली. यासिनला आधीच अटक झाल्याने त्यांची ही योजना फसली. यासिनने जेव्हा अणूबॉम्ब मागितला तेव्हा रियाझने या हल्ल्यात मुस्लिमांचाही बळी जाणार असे सांगितले. त्यावर यासिनने आपण मशिदींमध्ये पोस्टर लावून मुस्लिमांना शहर सोडून जाण्याचे आव्हान करु असे उत्तर दिले.