दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी केजरीवाल, सहा मंत्र्यांसह शपथविधी

नवी दिल्ली – आम आदमीचे सरकार बनले आहे; पण आम्ही एकटे लढू शकत नाही. सर्वजण मिळून ही भ्रष्टाचाराविरुद्धची लढाई आपल्याला लढायची आहे, असे उत्स्ङ्गूर्त उद्गार अरविंद केजरीवाल यांनी काढले. येथे शनिवारी साडे दहाच्या सुमारास अरविंद केजरीवाल यांना दिल्लीचे उपराज्यपाल नजीब जंग यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. श्री. केजरीवाल हे दिल्लीचे सातवे मुख्यमंत्री आहेत. केजरीवाल यांच्या सोबत मनिष सिसोदिया, गिरीश सोनी, सौरभ भारद्वाज, सत्येंद्र जैन, राखी बिर्ला, सोमनाथ भारती यांचाही शपथविधी झाला.

शपथविधी समारंभानंतर श्री. केजरीवाल म्हणाले की, आम्ही ही सत्ता जनतेच्या हातात देण्यासाठी घेतली आहे. येथील जनता भ्रष्टाचाराने हताश झाली आहे. तसेच सवंग राजकारणामुळे देशाच्या विकासाला खीळ बसली आहे. ही लढाई मला मुख्यमंत्री करण्यासाठी नाही, आम आदमीचे सरकार बनले आहे; पण आम्ही एकटे लढू शकत नाही. आपण सर्वजण मिळून ही लढाई लढू शकतो. तसेच सर्व समस्यांचे निराकरण उद्या लगेच होणार नाही. कारण आमच्याकडे अशी कोणतीही जादूची काठी नाही. दिल्लीचे दीड कोटी लोक मिळून हे सरकार चालवणार आहेत.

दोन वर्षांपूर्वी रामलीला मैदानावर अण्णा हजारेंनी उपोषण केले. पण राजकारण बदलल्याशिवाय परिस्थिती बदलणार नाही. तेव्हा वाटले नव्हते, की एवढा मोठा बदल होईल. अण्णा मला सांगत होते की, राजकारण चिखल आहे. त्यात जाऊन तुम्ही घाण व्हाल. पण मी त्यांना समजावून सांगत असे की, हा चिखल साङ्ग करण्यासाठी त्यात उतरूनच साङ्ग करावा लागेल.

लाच देणार नाही, घेणार नाही
यावेळी अरविंद केजरीवाल यांनी उपस्थित सर्वांना भ्रष्टाचार रोखण्यासाठी शपथ दिली. मी लाच घेणार नाही, लाच देणारही नाही, अशी शपथ त्यांनी दिली.

अण्णा हजारेंकडून शुभेच्छा
अरविंद केजरीवाल यांना ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पत्र लिहून शुभेच्छा दिल्या आहेत. अण्णांनी पत्रात लिहिले आहे, ‘माझी प्रकृती ठीक नसल्याने मी या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकत नाही. माझ्याकडून शपथ ग्रहण करणार्‍या सर्वांना शुभेच्छा.’