मुंबई – गेल्या काही दिवसांपासून मनसेने चित्रपटसृष्टीत पडद्यामागे कष्ट करणा-यासाठी व सतत राबणा-या हातांसाठी मनसेने काम केले आहे. त्यांमनी काम केले असल्या ने म्हणूनच मी आगामी काळात राज ठाकरेंसोबत मनसे कार्यक्रमात हजेरी लावली असे बीग बी अमिताभ बच्चन यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना स्पष्ट केले आहे.
मुंबईत नुकताच मनसे चित्रपट सेनेच्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने आयोजीत करण्याचत आलेल्या कार्यक्रमास बीग बी अमिताभ बच्चन यांनी हजेरील लावली होती. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून प्रसारमाध्यतमात वेगवेगळया अफवा पसरविल्या जात होत्याळ. या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर अनेक मराठी कलाकारांसोबतच बीग बी अमिताभ बच्चन आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकाच व्यासपीठावर दिसले. राज ठाकरेंची भेट म्हणजे उत्तर भारतीयांशी गद्दारी’ अशी टीकेची झड बीग बी यांच्यावर उठवली गेली होती.
याबाबत बोलताना अमिताभ बच्चन म्हणाले, ` चित्रपटसृष्टीत पडद्याच्या मागे अनेक लोक अथक परिश्रम करत असतात. चित्रपटांच्या यशामध्ये त्यांचा बरोबरीचा वाटा असतो. त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न होत असतील तर स्वागत आहे. चित्रपटसृष्टीतील कष्टक-यांसाठी व्यक्तीगत पातळीवर तसेच संस्थात्मक पातळीवर बरेच प्रयत्न सुरू असतात. या प्रयत्नांना बळ द्यायलाच हवं. मनसेने यादृष्टीनं खूपच चांगलं काम केलं आहे आणि अशा कामांना माझा नेहमीच पाठिंबा राहिला आहे.