मंत्रिमंडळ विस्तार तूर्तास लांबणीवर

मुंबई – चार राज्यांच्या निवडणुकांत झालेल्या दारुण पराभवामुळे कॉंग्रेसला जबरदस्त हादरा बसला आहे. त्यारमुळेच महाराष्ट्रा त आगामी काळात होत असलेल्याल लोकसभा व विधनसभा निवडणूकीच्या पार्श्वुभूमीवर महाराष्ट्रावर लक्ष केंद्रित केले आहे. महाराष्रा‍आगत आगामी काळात पक्ष अधिक मजबूत करण्यासाठी मंत्रिमंडळातील रिक्त जागा भरण्याचा विचार दिल्लीत सुरू होता; परंतु नाराजी वाढू नये यासाठी तूर्तास मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आला असल्यारचे विश्वरसनीय सूत्रांकडून समजते.

चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांत कॉंग्रेसला पराभव सहन करावा लागला आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी मोठे फेरबदल करण्याचे सूतोवाच कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केले होते. लोकसभेच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्यासह महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांना दिल्लीत बोलावून घेण्यात आले होते. त्याकवेळी मंत्रिमंडळातील रिक्त जागा भरण्याचा विचार दिल्लीत सुरू होता.

पक्षाची स्थिती अधिक मजबूत करण्यासाठी अनेक दिवसांपासून रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार तसेच महामंडळांच्या नियुक्त्या तत्काळ कराव्यात असा आग्रह प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी धरला होता मंत्रिमंडळ विस्ताराबरोबरच काही फेरबदलही केले जावेत व सुमार कामगिरी असलेल्या मंत्र्यांना मंत्रिमंडळातून वगळावे, अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली होती.

दिल्लीत झालेल्या बैठकीत यावर बराच खल झाला. मंत्रिमंडळातील रिक्त जागा व महामंडळावरील पदाधिकाच्या मर्यादित जागा आणि उत्सुकांची संख्या याचा विचार करता विस्तार व नियुक्त्यांमुळे पक्षात नाराजीच अधिक वाढेल अशी भीती या बैठकीत व्यक्त करण्यात आल्याने तूर्तास कोणताही बदल केला जाऊ नये, असे ठरल्याचे समजते. त्यारमुळे सध्या् तरी हा विषय पुन्हाी एकदा लांबणीवर पडला आहे.

Leave a Comment