दारुभट्टी अजित पवार, आर आर पाटील यांनी बंद करायची का? – उपमुख्यमंत्री

पुणे : पुण्यातील दारुभट्टी अजित पवार, आर आर पाटील यांनी बंद करायची का?, असे खडेबोल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील पोलिसांना सुनावले. अजित पवार यांनी आज सकाळी सात वाजता पुण्यातील फुरसुंगी कचरा डेपोला भेट दिली. त्यावेळी कचराडेपोजवळ दारूभट्टी सुरू असल्याचे निदर्शनाला आल्यानंतर पवारांचा पाराच चढला. त्यावेळी त्यांनी पोलिसांनी चांगलेच झापले.

कचºयांची विल्हेवाट नीट लागते आहे की नाही आणि स्थानिक नागरीकांच्या काय समस्या आहेत, हे पाहाण्यासाठी गेलेल्या अजित पवारांना डेपोजवळ धूर येत असल्याच दिसले. कचºयाला आग लागली आहे की काय, असं अजित पवार यांनी अधिकाºयांना विचारले. मात्र ही कचºयाला लागलेली आग नसून या ठिकाणी दारु भट्टी सुरु असल्याचं समजल्यावर अजित पवार चांगलेच भडकले.

सकाळी देशी दारुची भट्टी समोर पाहून अजित पवार चांगलेच संतापले आणि त्यांनी सोबत असलेल्या पोलीस अधिकाºयांना फैलावर घेतले. इथे सुरु असलेली दारु भट्टी तुम्हाला दिसत नाही का? ही भट्टी काय अजित पवार आणि आर. आर. पाटली यांनी येऊन बंद करायची का?, असे अजित पवार यांनी पोलीस अधिकाºयाना खडसावले. त्यामुळे सहाय्यक पोलीस आयुक्त आणि पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाºयांनी धावत जाऊन पोकलेन मशीन आणले आणि त्याद्वारे दारुभट्टी उद्धवस्त केली.

यावेळी अजित पवारांनी हडपसरचे पोलीस निरीक्षक रघुनाथ जाधव यांना दारुभट्टीचे व्हिडियो रेकॉर्डींग करण्यासही फर्मावलं. हे व्हिडियो रेकॉर्डींग जिल्हा नियोजनाच्या बैठकीच्या वेळी पोलीस आयुक्तांना दाखवण्यास आणा असं जाधव यांना बजावले. पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांच्याबद्दल अजित पवारांची असलेली नाराजी यावेळ स्पष्टपणे दिसून आली. या भागात दारुभट्टयांवर अनेक वेळा कारवाई करुनही जागा बदलून या दारुभट्टया पुन्हा सुरु होत असल्याच पोलिसांचे म्हणणे आहे.

Leave a Comment