टीम इंडियाचा डाव ३३४ धावांवर आटोपला

डर्बन- दक्षिण आफ्रिकेविरूदच्या दुस-या कसोटी सामन्याात दुस-या दिवशी टीम इंडियाने निराशा केली आहे. पावसामुळे तीन तासांहून अधिक खेळ वाया गेल्यानंतर याच पावसामुळे खेळपट्टीने सरड्यासारखा रंग बदलला आणि टीम इंडियाचा पहिला डाव ३३४ धावांवर आटोपला. एकवेळ हिंदुस्थान ५ बाद ३२० अशा स्थितीत होता; पण स्टेनच्या गोलंदाजीपुढे उर्वरित संघ १४ धावांतच बारद झाला. स्टेनने शुक्रवारी दोनवेळा ट्रिपल स्टाइक घेताना टीम इंडियाचा चेहरामोहराच बदलला. प्रत्युत्तरादाखल दक्षिण आफ्रिकन सलामीवीरांनी उर्वरित २० षटकांच्या खेळात बिनबाद ८२ धावांपर्यंत मजल मारली. दुसर्यार दिवसाचा खेळ संपला तेव्हा कर्णधार ग्रॅमी स्मिथ ३५ तर अलविरो पीटरसन ४६ धावांवर खेळत होते.

दुस-या कसोटी सामन्यात गुरुवारी अंधुक प्रकाशामुळे पहिल्या दिवसाचा खेळ लवकर थांबवावा लागला होता. पावसाच्या व्यत्ययामुळे ही लढत सव्वा चार वाजता सुरू झाली. गुरुवारी ९१ धावांवर नाबाद असलेल्या मुरली विजयच्या शतकांकडे देशवासीयांचे लक्ष लागले होते. मात्र ९७ धावांवर तो बाद झाल्याने चाहते निराश झाले. सामना सुरू होताच स्टेनने हल्ला चढवला. त्याने १ बाद १९८ अशा मजबूत स्थितीत असलेल्या टीम इंडियाची फलंदाजी क्षणात खिळखिळी केली. १० चेंडूंत एकही धाव न देता त्याने आधी पुजाराचा अडथळा दूर केला आणि मग शतकाच्या उंबरठ्यावर असलेल्या विजयला टिपले आणि पुढच्या चेंडूंवर रोहित शर्माला उखडले. क्षणात ४ बाद १९९ अशा अवस्थेत संघ पोहोचला.

त्यानंतर विराट कोहली (४६), अजिंक्य रहाणे (नाबाद ५१) व कर्णधार महेंद्रसिंग धोनी (२४) यांनी थोडाफार प्रतिकार केला. रहाणे आणि धोनीने ५५ धावांची भागी केली होती. पण स्टेनने पुन्हा घात केला. पुढच्या ७ चेंडूंत झहीर खान आणि इशांत शर्मा यांना बाद करून टीम इंडियाचा डाव संपवला. स्टेनने १०० धावांत ६ फलंदाज गारद केले आणि दक्षिण आफ्रिकन टीम इंडियाला मोठ्या धावसंख्येपासून वंचित ठेवले. ५ बाद ३२०वरून सर्वबाद ३३४ असा कोलमडला. अजिंक्य रहाणे ५१ धावांवर नाबाद राहिला. प्रत्युत्तरादाखल दक्षिण आफ्रिकन सलामीवीरांनी उर्वरित २० षटकांच्या खेळात बिनबाद ८२ धावांपर्यंत मजल मारली. दुसर्या् दिवसाचा खेळ संपला तेव्हा कर्णधार ग्रॅमी स्मिथ ३५ तर अलविरो पीटरसन ४६ धावांवर खेळत होते.

Leave a Comment