दुबई- दुबई येथे बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते फारूख शेख (६५) यांचे शुक्रवारी रात्री हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. फारूख शेख यांचे पार्थिव तेथील सर्व सरकारी प्रक्रीया पूर्ण करून शनिवारी मुंबईत अंत्यविधीसाठी आणले जाणार आहे. त्यांच्यास निधनामुळे बॉलीवूडमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
शेख यांनी ७० ते ८० च्या दशकात अनेक प्रसिद्ध सिनेमात भूमिका केली होती. सत्यजित रे यांचा ‘शतरंज के खिलाडी’, ‘चष्मे बद्दूर’, ‘किसी से ना केहना’, ‘नुरी’ या सिनेमातील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या.
शेख यांनी १९७३ मध्ये गरम हवा’ या सिनेमापासून बॉलिवूडमधील आपल्या कारकिर्दीला सुरवात केली. तर, ‘ये जवानी है दिवानी’ हा त्यांचा शेवटचा सिनेमा ठरला. या सिनेमात त्यांनी रणबीर कपूरच्या वडीलांची भूमिका केली होती. दूरदर्शनवरील त्यांचा ‘जिना इसी का नाम है’ हा कार्यक्रम गाजला होता. शनिवारी त्यां चा पार्थीववार मुंबईत अंत्यविधी करण्यात येणार आहेत.