तोशिबाने सादर केली सॅटेलाईट लॅपटॉप्सची रेंज

मुंबई- तोशिबा या इलेक्ट्रोनिक उपकरण उत्पादन कंपनीने भारतात सॅटेलाइट्र्ट लॅपटॉप्सची मोठी रेंज सादर केली आहे. त्यात १८ विविध प्रकारचे लॅपटॉप आहेत. आपल्या गरजा ठरवून त्याप्रमाणे खरेदी करण्याची संधी यामुळे ग्राहकांना मिळणार आहे. या लॅपटॉपच्या किंमती २१ ७३६ रूपयांपासून पुढे आहेत. हे लॅपटॉप्स प्रामुख्याने प्रोफेशनल आणि तरूण वर्गासाठी अधिक उपयुक्त आहेत.

पी,एल,एस आणि सी कॅटेगरीत हे लॅपटॉप अथवा नोटबुक्स विभागले गेले असून युजर एच.डी अथवा फुल एचडी स्क्रीनमध्ये त्यांची निवड करू शकणार आहेत. यातील सर्वात स्वस्त सॅटेलाईट नोटबुक सी ८५० -इ ००११ हा असून त्यासाठी दोन जीबी रॅम आणि १५.६ इंची एलइडी स्क्रीन देण्यात आला आहे. सर्वात महाग लॅपटॉप ब ५०- ए-वाय ३११० हा असून त्याला फुल एचडी स्क्रीन आणि विंडोज ८.१ ओएस सिस्टीम दिली गेली आहे त्याची रॅम ८ जीबीची असून ती १६ जीबी पर्यंत वाढविता येते असे कंपनीतर्फे सांगण्यात आले आहे.

Leave a Comment