मुलायमसिंग यादव यांना घरचा आहेर

लखनौ – समाजवादी पार्टीचे सर्वेसर्वा मुलायमसिंग यादव यांनी मुजफ्ङ्गरपूर जिल्ह्यातील मदत छावण्यांमध्ये खरे गरजू लोक रहात नसून दंगलखोर रहात आहेत, असा आरोप केला होता. पण त्यांच्याच पक्षाच्या सरकारने नेमलेल्या एका सरकारी समितीने मुलायमसिंग यांचा हा आरोप ङ्गेटाळून लावला असून या छावण्यांमध्ये राहणारे लोक खरेखुरे दंगलखोरच आहेत, असे स्पष्ट केले आहे.

या चौकशी समितीने विविध मदत छावण्यांत ७ सप्टेंबर ते २० डिसेंबरच्या कालावधीत ३४ लहान मुले मरण पावली असल्याचे दाखवून दिले आहे. ही सर्व मुले बारा वर्षांच्या आतील आहेत. मुजफ्ङ्गरनगर जिल्ह्यातील लोई, मलकपूर येथील मदरसा, बरनवी आणि शामली येथील इदगाहमध्ये सध्या ४,७८३ दंगलग्रस्त रहात आहेत.

या समितीने हे सर्व लोक दंगलग्रस्तच असल्याचा निर्वाळा दिला आहे. या छावण्यातील मुलांच्या मृत्यूमागे विविध कारणे आहेत. परंतु पोटाच्या विकाराने बरीच मुले दगावत आहेत असे या समितीचे प्रमुख आणि राज्य सरकारच्या गृह खात्याचे प्रधान सचिव ए.के. गुप्ता यांनी म्हटले आहे.

Leave a Comment