नमो स्टोअरमधून करा ऑनलाईन खरेदी

ऑन लाईन स्टोअरची टीम मेंबर असलेल्या लाईव्ह मिटने दिलेल्या माहितीनुसार देशात नमो स्टोअर नावाने नवीन ऑनलाईन खरेदी स्टोअर सुरू झाले असून भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची प्रेरणा त्यामागे आहे. या स्टोअरमध्ये टी शर्ट, स्टेशनरी मटेरियल. पेपरवेट, रिमाईंडर पॅड, पेन स्टँड, नोटबुक्स तसेच पेन ड्राईव्ह अशा वस्तू विक्रीसाठी उपलब्ध आहेत. या वस्तूंवर मोदींच्या प्रतिमा, एखादा संदेश, लोगो, घोषणा छापलेल्या आहेत असेही समजते.

नमो स्टोअरची रिटेल दुकानेही भारतातील प्रमुख शहरातून लवकरच सुरू होत असून पहिले स्टोअर अहमदाबादेत सुरू करण्यात येत आहे. भविष्यात अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचता यावे यासाठी ही दुकाने सुरू केली जात आहेत. या व्यापारात फायदा हे ध्येय ठेवण्यात आलेले नाही.

नोव्हेंबरमध्येच मोदींवरून प्रेरणा घेऊन- मोदी रन – हा गेम अॅड्राईडवर मोफत उपलब्ध करून दिला गेला आहे. या गेममध्ये मोदी यांचे कॅरेक्टर वाटेतले अडथळे दूर करून हिरे गोळा करताना दाखविले गेले आहे. हे हिरे लपविलेली ठिकाणे म्हणजे भारताची विविध राज्ये आहेत. सप्टेंबरमध्ये मोदी स्मार्टफोन सादर केला गेला आहे. आगामी लोकसभा निवडणुकांसाठी सोशल मिडियाचा वापर अशा प्रकारेही करून घेतला जात असल्याचे हे उत्तम उदाहरण होय.