टीम इंडियाची दमदार सुरूवात

डर्बन : टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुस-या कसोटी सामन्याहत दमदार सुरूवात केली आहे. टीम इंडियाचा डाव सलामीवीर मुरली विजय आणि चेतेश्वर पुजाराने सांभाळला आहे. विजयपाठोपाठ पुजारानेही संयमी अर्धशतक झळकावले आहे. पुजाराने ९७ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. टीम इंडियाने दमदार सुरुवात केली असून पहिल्या दिवशी प्रकाशझोतामुळे सामना थांबला तेंव्हा एक गडी बाद १८१ धावा केल्याव होत्याप.

तत्पूर्वी मुरली विजयनेही डर्बनमध्ये आपले शानदार अर्धशतक साजरे केले असून, त्याची शतकाकडे वाटचाल सुरू आहे. विजयने १०२ चेंडूत १० चौकार लगावात आपले अर्धशतक साजरे केले.विजयचे कसोटी कारकीर्दीतले हे चौथे अर्धशतक ठरले आहे. या कसोटीत भारताने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय़ घेतला आहे. मात्र या कसोटीतही सलामीवीर शिखर धवन मोठी धावसंख्या करू शकला नाही.

मॉर्ने मॉर्कलनं धवनला २९ धावांवर बाद केले. त्याआधी धवनने सावध सुरुवात करत मुरली विजयच्या साथीनं ४१ धावांची भागीदारी रचली.धवन बाद झाल्यावर विजयने पुजाराच्या साथीने डाव सावरला. या जोडीने शतकी भागिदारी रचली. टीम इंडियाने दमदार सुरुवात केली असून पहिल्यार दिवशी प्रकाशझोतामुळे सामना थांबला तेंव्हान एक गडी बाद १८१ धावा केल्याा होत्यात.

Leave a Comment