नवी दिल्ली: काही दिवसांपूर्वी झालेल्याम निवडणूकीत दिल्लीतील सत्ता हातून निसटल्यानंतर काँग्रेसचे नेते घोटाळ्यांचे पुरावे नष्ट करण्यात गुंतल्याची चर्चा सुरु आहे. दिल्लीसतील सत्ते१ची सुत्रे आपच्याे हाती गेल्यावने माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्या कार्यालयात कागदपत्रांची फाडाफाडी सुरु असल्याचे समजते. गेल्यान काही दिवसांपासून अशास्वारूपाची ही बातमी दिल्लीतल्या राजकीय वर्तुळात फिरते आहे.
काही दिवसांपूर्वीपासून सत्तेावर असलेल्याक काँग्रेसच्या राज्यात नक्कीच काळंबेरं झाल्याची शंका आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे भावी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केली आहे. यांसदर्भात ते पत्रकारांशी बोलत होते. मंत्र्यांच्या स्टाफ आणि अनेक गोपनीय विभागांमधील फाईल आणि महत्त्वाचे कागदपत्रे नष्ट करण्यात येत आहेत. फायलींमधून कागदपत्र फाडली जात आहेत. त्याचबरोबर अधिका-यांची टेबल आणि कपाट साफ करण्यात येत आहेत, असे बोलले जात आहे.
या काळात सर्व प्रशासकीय कागदपत्रांची आणि फायलींच्या सुरक्षेची जबाबदारी राज्यांच्या मुख्य सचिवांवर असून ती जबाबदारी त्यांनी योग्यरित्या पार पाडावी, असंही अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे. आपल्या सरकारमध्ये भ्रष्टाचार सहन केला जाणार नाही, असं केजरीवाल यांनी सांगितलं आहे.