अश्विनला पॉली उम्रीगर पुरस्कार जाहीर

मुंबई: ऑफ स्पिनर रवीचंद्रन अश्विनला बीसीसीआयने २०१२-२०१३ या वर्षातला सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटर म्हणून पॉली उम्रीगर पुरस्कार जाहीर केला आहे. त्या२मुळे आर अशिवनवर सर्व स्तीरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. बीसीसीआयच्या पुरस्कार सोहळ्यात नायरला अडीच लाख रुपये आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात येईल.

बीसीसीआयचा वार्षिक पुरस्कार वितरण सोहळा ११ जानेवारी रोजी मुंबईच्या ताज लँण्डसमध्ये होईल. या सोहळ्यात अश्विनला पाच लाख रुपये आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात येईल.२०१२-२०१३ या वर्षात रणजी करंडकातला सर्वोत्तम अष्टपैलू म्हणून मुंबईच्या अभिषेक नायरला लाला अमरनाथ पुरस्कारानं गौरवण्यात येईल. बीसीसीआयच्या पुरस्कार सोहळ्यात नायरला अडीच लाख रुपये आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात येईल.
या सुरू असलेल्याद वर्षातल्या सर्वोत्तम सर्वसाधारण कामगिरीसाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनला सन्मानित करण्यात येईल. मुंबईच्या रोहित शर्माला वेस्ट इंडिजविरुद्धच्या सर्वोत्तम कामगिरीसाठी दिलीप सरदेसाई पुरस्कार बहाल करण्यात येईल.

बापू नाडकर्णी, फारुख इंजिनियर आणि दिवंगत एकनाथ सोलकर यांची बीसीसीआयने विशेष गौरवमूर्ती म्हणून निवड केली आहे.नाडकर्णी आणि इंजिनियर यांच्यासह सोलकर यांच्या कुटुंबियांना स्मृतिचिन्ह आणि १५ लाख रुपये देऊन गौरवण्यात येईल.

Leave a Comment