महिला हेरगिरी, चौकशी आयोग स्थापन

नवी दिल्ली – गुजरातमधील महिला हेरगिरी प्रकरणात केंद्रीय मंत्रिमंडळाने चौकशी आयोग स्थापन करण्यास मंजूरी दिली आहे. हा आयोग गुजरात सरकारने बेकायदारित्या केलेल्या तरुण महिलेच्या हेरगिरीची चौकशी करणार आहे. चौकशी आयोग कायदा १९५२ च्या कलम तीन अंतर्गत या चौकशी आयोगाला मंजूरी देण्यात आली आहे. या चौकशी आयोगामुळे गुजरातचे मुख्यमंत्री आणि भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या अडचणी वाढू शकतात. कारण नरेंद्र मोदी यांच्या इशा-यावरुनच या महिलेवर गुजरात पोलिसांनी पाळत ठेवल्याचा आरोप होत आहे.

भाजपचे वरिष्ठ नेते अरुण जेटली यांनी चौकशी आयोग स्थापण्याच्या निर्णयावर टिका केली असून, याला न्यायालयात आव्हान देता येऊ शकते असे म्हटले आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाचा हा निर्णय संघराज्य प्रणालीवर अतिक्रमण असल्याचे त्यांनी म्हटले आहे. गुलेल या संकेतस्थळाने नरेंद्र मोदींचे त्या महिलेसोबतचे छायाचित्र प्रसिध्द केले होते तसेच या हेरगिरीशी संबंधित ऑडिओ टेप्सही प्रसिध्द केल्या आहेत.

Leave a Comment