पुरूषांतही वाढतोय दागिन्यांचा सोस

मुंबई – दागिने आणि महिला यांचे अतूट नाते सार्‍या जगाने मान्य केलेले आहे आणि महिलांचा दागिन्याचा सोस हा नेहमीच पुरुषांसाठी चेष्टेचा विषय राहिला आहे. मात्र प्लॅटिनम गिल्ड इंटरनॅशनल ने केलेल्या सर्वेक्षणात महिलांप्रमाणेच सर्व वयोगटातील पुरूषही दागिने खरेदी आणि वापर यांच्या मोहात पडत चालले असल्याचे स्पष्ट झाले आहे हे सर्वेक्षण पुरूषांसाठी दागिन्यांचे मार्केट कसे आहे यासाठी करण्यात आले होते व त्यामध्ये दागिने खरेदी पुरूषांची गुंतवणूक, नवीन ट्रेंड दागिने डिझाईन या संबंधीचे सर्वेक्षणही केले गेले आहे.

प्लॅटिनम गिल्ड इंटरनॅशनलच्या इंडिया कंट्री मॅनेजर वैशाली बॅनर्जी या संदर्भात माहिती देताना म्हणाल्या की सर्वेक्षणात असे दिसून आले मेट्रो शहरात सर्व वयोगटातील पुरूषांत दागिन्यांची क्रेझ आहेच मात्र त्यातही दिल्ली, बंगलोर आणि चेन्नईतील पुरूष वर्ग दागिने खरेदी आणि वापरात आघाडीवर आहे. गुजराथमधील पुरूष वर्ग सोन्याची नाणी अथवा बिस्कीटे खरेदी करण्यास अधिक प्राधान्य देतात तर तरूणाई स्वतःच्या पैशातून दागिने खरेदी करणे पसंत करते.पुरूष घेत असलेल्या दागिन्यांत अंगठी, चेन, ब्रेसलेट खरेदी करण्याचे प्रमाण अधिक आहे. उत्तरेकडील भागात स्वतःच्या कमाईतून दागिने खरेदी करण्याकडे पुरूषमंडळींचा कल अधिक आहे;

हे सर्वेक्षण मुंबई, अहमदाबाद, चेन्नई, कोचीन, बंगलोर, हैद्राबाद, बडोदा, पुणे, कोलकाता या भागात पुरूषांच्या दागिन्यांसाठी मार्केट कसे आहे हे जाणून घेण्यासाठीही करण्यात आले. त्यात पुरूषांची जीवनशैली, मनोधारणा, दागिन्यांकडे पाहण्याची दृष्टी त्याचबरोबर त्यांच्या सवयी आणि दागिन्यांची खरेदी आणि वापर करण्याकडे असलेला कल जोखण्यात आला. विशेष म्हणजे तरूणांत प्लॅटिनम आणि सोन्याचे दागिने अधिक आवडते आहेत असेही यात दिसून आले.

मेन लक्झरी अॅक्सेसरीज मध्ये भारत जगात भारत ३ नंबरचे मोठे मार्केट आहे.

Leave a Comment