पलाश सेनच्या स्त्रियांवरील टिप्पणीवरून कल्लोळ

मुंबई – ह्ययुफोरियाह्य या अल्बमच्या माध्यमातून अल्पावधीतच तरुणाईची मने जिंकणारा गायक पलाश सेन ह्यआयआयटी-मुंबईह्यच्या ह्लमूड इंडिगो फेस्टिव्हलह्यमधील एका कार्यक्रमात केलेल्या वादग्रस्त विधानामुळे अडचणीत आला आहे. पलाशच्या वक्तव्यावर सोशल नेटवर्किंगवरून टीकेची झोड उठविण्यात आली आहे. याशिवाय त्याच्यावर कारवाईची मागणीही करण्यात येत आहे.

ह्यकॅम्पसमध्ये कोणी चांगल्या दिसणाºया मुली आहेत का?ह्य असे पलाशने विचारल्यावर मुलांनी ह्यनाहीह्य असा प्रतिसाद दिला. त्यावर पलाशने काळजी करू नका. तुम्ही शिक्षण घेऊन कॅम्पसबाहेर पडलात, की तुम्हाला चांगल्या मुली दिसतील; ज्या तुमच्यासाठी घरी स्वयंपाक करतील. पलाशच्या अशा विधानानंतर सोशल मीडियावर चचेर्चे एकच वादळ उठले.

पलाशच्या वक्तव्यावर ह्लआयआयटी मूड इंडिगोह्यच्या नियोजन समितीने फेसबुकवर जाहीर माफी मागितली आहे. कार्यक्रमादरम्यान पलाशने केलेल्या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो. चुकीच्या शेरेबाजीबाबत आम्ही माफी मागतो. नियोजन समिती या प्रकरणात आता पुढील कारवाई करणार आहे, असे ह्यफेसबुक पोस्टह्यमध्ये नमूद करण्यात आले आहे. या वेळी ह्लट्विटरह्यवरही याचा तीव्र निषेध करण्यात आला आहे

Leave a Comment