नवीन वर्ष आतषबाजीत दुबई करणार वर्ल्ड रेकॉर्ड

दुबई – यंदाच्या नवीन वर्षाचे म्हणजे २०१४ सालचे स्वागत करण्यासाठी करण्यात येणार्‍या आतषबाजीत दुबईने यंदा गिनिज बुक ऑफ रेर्कार्डमध्ये नांव नोंदविण्याचे ठरविले आहे. ३१ डिसेंबरच्या रात्री करण्यात येणार्‍या या आतषबाजीसाठी खास व्यवस्था दुबईत केली गेली आहे.

या रात्री द पाम जुमेरा आणि द वर्ल्ड आयलंडस येथे सहा मिनिटांची आतषबाजी केली जाणार आहे. चारशे ठिकाणी एकाच वेळी उडविण्यात येणार्‍या शोभेच्या दारूचे संचालन खास नेमलेले २०० तज्ञ करणार आहेत. त्यासाठी १०० संगणकांचे नेटवर्क उभारले गेले आहे. दारूकाम पाहाण्यासाठी येणार्‍या नागरिकांच्या तसेच दुबई निवासियांच्या सुरक्षेसाठी खास व्यवस्था करण्यात आली असून आतषबाजी सुरू होण्यापूर्वी त्या ठिकाणी येणे जाणे सुलभ व्हावे म्हणून प्रत्येक घरांसाठी विशेष पास दिले गेले आहेत असेही समजते.

३१ डिसेंबरच्या रात्री दुबईचे आकाश नानाविध रंगीबेरंगी फटाके आणि दारूकामाने उजळून निघणार आहे.