दुस-या कसोटीत टीम इंडियाला विजयाची संधी

डर्बन: दक्षिण आफ्रिका विरूद़ध गुरूवारपासून दुसरा कसोटी सामना सुरू होत आहे. या सामन्यातत टीम इंडियाला विजयाची संधी चालून आली आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका संघांमधल्या दुसया कसोटीला आजपासून डर्बनच्या किंग्समीडवर सुरुवात होत आहे.

दक्षिण आफ्रिकेली एक वेगवान खेळपट्टी असा डर्बनच्या किंग्समीडचा आजवरचा लौकिक आहे. त्यािप्रमाणे किंग्समीडवर फलंदाजी करणे म्हणजे जणू आगीच्या निखा-यावरून चालत जाण्यासारखे आहे. धोनीच्या टीम इंडियाने २०१० साली डर्बन कसोटी जिंकली असली, तरी किंग्समीडवरचा टीम इंडियाची एकंदर कामगिरी भूषणावह नाही.
१९९२ सालच्या पहिल्या दौ-यात टीम इंडियाला डर्बनची कसोटी अनिर्णीत राखता आली ती केवळ प्रवीण आम्रेने पदार्पणात झळकावलेल्या शतकाच्या जोरावर. मग १९९६ साली त्याच किंग्समीडवर भारताला तब्बल ३२८ धावांनी लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला. मग २००६ साली दक्षिण आफ्रिकेने डर्बनवर भारताचा १७४ धावांनी धुव्वा उडवला. २०१० साली मात्र धोनीच्या टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेवर ८७ धावांनी बाजी उलटवली. भारतीय फलंदाज सपशेल अपयशी ठरूनही झहीर खान, श्रीशांत, ईशांत शर्मा आणि हरभजनसिंग या चार गोलंदाजांनी भारताला ती कसोटी जिंकून दिली होती.

डर्बनच्या किंग्समीडचा हाच लौकिक लक्षात घेतला तर दुस-या कसोटीत टीम इंडियाला आपल्या गोलंदाजांकडून मोठी अपेक्षा राहिल. झहीर खान, ईशांत शर्मा आणि मोहम्मद शमी या मध्यमगती त्रिकुटाने जोहान्सबर्ग कसोटीत दक्षिण आफ्रिकेचा डाव स्वस्तात गुंडाळला असला तरी दुस-या डावात त्या तिघांनाही फारसं यश लाभले नाही. ऑफ स्पिनर अश्विनची झोळी तर दोन्ही डावांमध्ये रिकामीच राहिली. त्यामुळे जोहान्सबर्ग कसोटी टीम इंडियाच्या हातून अलगद निसटली. आता डर्बन कसोटीवर वरचष्मा राखायचा तर झहीर अँड कंपनीला आपली सर्वोत्तम कामगिरी बजावावी लागणार आहे.

Leave a Comment