काँगेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नारायण राणे यांच्या निवडीची शक्यता

मुंबई – काही दिवसांपूर्वी झालेल्याा चार राज्यातील निवडणूकीत कॉग्रेंसला पराभव झाल्यादने महाराष्रत संघटनात्म क फेरबदलाची शक्यीता वर्तविण्याहत येत आहे. या निकालांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील संघटनात्मक फेरबदलात उद्योगमंत्री नारायण राणे अथवा कृषीमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या गळ्यात प्रदेशाध्यक्षपदाची माळ पडण्या ची शक्यशता वर्तवली जात आहे. प्रदेशाध्यक्षपदाबाबत राज्यातील नेत्यांची मते जाणून घेतली जात आहेत.

आगामी काळात होत असलेल्या राज्याेतील संघटनात्मक फेरबदलाबाबत मंगळवारपासून दिल्लीत काँगेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी हे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि महाराष्ट्राचे काँगेसचे प्रभारी मोहन प्रकाश यांच्याशी चर्चा करीत आहेत. माणिकराव ठाकरे यांना प्रदेशाध्यक्षपदावरून हटवून लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर नवा प्रदेशाध्यक्ष आणण्यात येणार आहे. आगामी काळात फेरबदलात माणिकराव ठाकरे यांची राज्य मंत्रिमंडळात वर्णी लागणार आहे.

भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यामुळे निर्माण झालेली हवा रोखण्यासाठी आक्रमक प्रदेशाध्यक्ष द्यावा का, यावर काँगेसमध्ये विचारमंथन सुरू आहे. उद्योगमंत्री नारायण राणे यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद दिले तर शिवसेना-भाजप युतीला ते चांगलेच प्रत्युत्तर देतील, असे काँगेसमधील एका गटाला वाटते. त्यामुळे त्यांच्याकडून राणे यांच्या नावाची शिफारस करण्यात येत आहे. मंत्रिपदाबरोबरच प्रदेशाध्यक्षपद दिले तर ते घेण्यास राणे राजी झाले आहेत.

राणे यांच्याबरोबर कृषीमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. काँगेसमधील काही लोकांचा राणे यांच्या नावाला विरोध आहे. त्यामुळे विखे यांच्या नावाबाबतही चाचपणी सुरू आहे. विखे-पाटील यांच्या नावाला मराठवाडा आणि विदर्भातील काँगेसच्या आमदारांचा पाठिंबा आहे. परंतु, ते शिवसेना-भाजप युतीच्या आक्रमक प्रचाराला कसे उत्तर देतील, याबद्दल शंका व्यक्त केली जाते. एकेकाळी विखे हेही शिवसेनेत होते, याकडे लक्ष वेधण्यात येते.

Leave a Comment