ऑलराऊंडर जॅक कॅलिस होणार निवृत्त

डर्बन – दक्षिण आफ्रिकन ऑलराऊंडर क्रिकेटर जॅक कॅलिसने भारताविरूद्ध होणाऱ्या डर्बन टेस्टनंतर आंतरराष्ट्रीय टेस्ट क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. ३८ वर्षीय कॅलिसनं ह्यट्विटरह्ण या सोशल नेटवर्किंग साईटवर रिटारयमेंट घेणार असल्याचं जाहीर केलंय.

ह्य२०१५ वन-डे वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिकचं प्रतिनिधित्व करता यावं याकरता टेस्ट क्रिकेटला अलविदा केल्याचंह्ण त्याने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. १४ डिसेंबर १९९५ रोजी जॅकनं आपल्या करिअरमधली पहिली टेस्ट मॅच इंग्लंडविरुद्ध खेळली होती. जॅक कॅलिसने १६५ टेस्टमध्ये १३ हजार १७४ रन्स करताना ४४ सेंच्युरीसह ५८ हाफ सेंच्युरी झळकावल्या आहेत. कॅलिसची टेस्ट करिअरची अखेरची मॅच २६ डिसेंबरपासून डर्बन इथं रंगतेय.

Leave a Comment