अॅपलचे आयफोन आणि आयपॅड यांच्या नव्या मॉडेलसंबंधीची चर्चा सातत्याने सुरूच असते. आयफोन पाच नंतर आयफोन सहा अधिक मोठ्या स्क्रीनसह अपेक्षेपेक्षा लवकरच बाजारात आणला जाणार असल्याची चर्चा सध्या जोरात असून डिजी टाईम्सने दिलेल्या अहवालानुसार हा स्मार्टफोन मे २०१४ मध्येच बाजारात दाखल होणार आहे आणि पाच इंचाचा स्क्रीन तसेच २० एनएमचा प्रोसेसर अशी त्याची वैशिष्ट्ये असतील. हा प्रोसेसर तैवान मधील सेमी कंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग कंपनीचा असेल असेही सांगितले जात आहे.
या फोनसाठी दोन वेगळ्या साईजच्या स्क्रीनच्या चाचण्या केल्या जात आहेत. हा स्क्रीन ५.७ इंचाचा आणि फुल एच.डी रेझोल्युशनसह हा स्क्रीन असेल. याचबरोबर आयपॅड प्रो ही आयपॅड एअर पेक्षा मोठ्या स्क्रीनमध्ये बाजारात आणला जाणार असल्याचे समजते. आयपॅड प्रो १२. इंचाचा असेल आणि उत्तर अमेरिकेतील शैक्षणिक बाजारावर या प्रो साठी लक्ष केंद्रीत केले जाणार आहे असेही सांगितले जात आहे. अॅपलचा टॅब्लेट आक्टोबर २०१४ ला बाजारात आणला जाईल असे चीनी पब्लीकेशन पॅड न्यूजने म्हटले आहे.