
नवी दिल्ली – राजधानी दिल्लीमध्ये २८ डिसेंबर रोजी ह्यआपह्यची सत्ता अस्तित्त्वात येईल. अरविंद केजरीवाल यांच शपथविधी सोहळा २८ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता पार पडेल. मुख्य सचिवांसोबत झालेल्या बैठकीनंतर अरविंद केजरीवालांनी ही माहिती दिली. अरविंद केजरीवाल यांच्यासह मंत्र्यांचा शपथविधी कार्यक्रम दिल्लीच्या रामलीला मैदानावर होणार आहे.
याच मैदानात अण्णा हजारे यांनी २०११ मध्ये याच मैदानावर भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाला सुरुवात केली होती. आम आदमी पाटीर्चा जन्म याच आंदोलनातून २०१२ मध्ये झाला होता. केजरीवालांच्या शपथविधीला अण्णा हजारे, किरण बेदी आणि संतोष हेगडेंना आम आदमी पार्टी निमंत्रण पाठवणार असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, हा कार्यक्रम अत्यंत साधेपणाने करणार असल्याची घोषणा, अरविंद केजरीवाल यांनी याआधीच केली होती. कार्यक्रमात ना कोणाला विशेष निमंत्रण असेल ना व्हीआयपी ट्रीटमेंट मिळणार नसल्याचेही त्यांनी जाहीर केले आहे.