अभिनेत्री वीणा मलिकने केले गुपचूप लग्न

गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री वीणा मालिक भलतीच फॉर्मत आहे. त्यातच आता पाकिस्तानी अभिनेत्री वीणा मलिक हिने गुपचुप लग्न केले आहे. दुबईतील उद्योगपती असद बशीरसोबत तिने निकाह केला आहे. वीणा मलिक बिग बॉसच्या चौथ्या सीझनमधील प्रमुख स्पर्धक होती. तिने गुपचूपच लगन केल्यासने हाच सर्वांसाठी चर्चेचा विषय ठरला आहे.

नेहमीच आपल्या वागण्या-बोलण्याने पाकिस्तानपासून भारतामध्ये वादात असणा-या वीणाने गुपचुप लगीनगाठ बांधली आहे. २९ वर्षीय या अभिनेत्रीने नुकताच दुबईमधील एका कोर्टात निकाह केला. असद बशीरचा दुबई आणि अमेरिकेत व्यवसाय आहे. असद हा वीणा मलिकच्या वडिलांच्या मित्राचा मुलगा आहे.

विवाहानंतर पत्रकारांशी बोलताना वीणा म्हणाली, मी आज खूप खुश आहे. मी जगातील भाग्यवान मुलगी आहे, असे मला वाटत आहे. आपल्या कुटुंबियांनी निवडलेल्या मुलाशी मी लग्न केले आहे. या विवहाची मी सर्वांना आमत्रंण दिले होते.

Leave a Comment