सोलापूर – मध्य प्रदेशातल्या खंडवा येथील कारागृहातून गेल्या ऑक्टोबरमध्ये सीमीचे पाच कार्यकर्ते पळाले होते. या पलायनाच्या संदर्भात मध्य प्रदेशात पाच जणांना आणि सोलापुरात दोघांना अटक करण्यात आली आहे. मध्य प्रदेशाच्या पोलिसांनी पाच जणांना बरवानी येथे अटक केली, त्यावेळी त्यांची या दहशतवाद्यांशी चकमक झडली. मंगळवारी पहाटे झालेल्या या चकमकीत त्यांच्यावर मात करून पोलिसांनी त्यांना जेरबंद केले.
बरवानी येथे अटक केलेल्या पाच जणात मुंबईचा अबू ङ्गैजल, सोलापूरचा खलीद अहमद आणि माहिदपूर इथला इरङ्गान नागोरी या तिघांचा समावेश आहे. याशिवाय आणखी दोघांना अटक झाली आहे, परंतु त्यांची नावे समजू शकली नाहीत. या पाच जणांना इंदूरच्या वन विभागाच्या विश्रामगृहात कडक बंदोबस्तात ठेवण्यात आले आहे.
पाच जणांतील मुंबईचा अबू ङ्गैजल हा खांडवाच्या कारागृहात होता आणि तिथून तो पळाला होता. त्याच्या सोबत पळालेल्या आणखी एका अतिरेक्याला पोलिसांनी ताबडतोब जेरबंद केले आणि त्याने दिलेल्या माहितीवरून या पाच जणांचा सुगावा लागला. याच माहितीवरून सोलापुरात दोघांना अटक करण्यात आली आहे.
सोलापूरचा महमद सादीक अब्दुल वहाब लुंजे आणि ओमर अब्दुल हाङ्गिज दंडोती या दोघांना मंगळवारी रात्री इंदूरच्या पोलिसांनी सोलापूरच्या पोलिसांच्या मदतीने त्यांच्या घरी जेरबंद केले. या व्यतिरिक्त सोलापूरच्या आणखी दोघांना ताब्यात घेण्यात आले होते, परंतु त्यांना चौकशी करून सोडून देण्यात आले. अटक करण्यात आलेल्या सर्व संशयिताकडून स्ङ्गोटके, बोगस सीम कार्ड, आक्षेपार्ह साहित्य आणि नगदी पैसे त्याचबरोबर काही संशयास्पद सीडी जप्त करण्यात आल्या आहेत.