सुपरस्टार कुत्रा एरिन

अमृतसर – जगातल्या पहिल्या दहा मध्ये त्याचे रॅकींग आहे, अडीच हजार रूपये किमतीची टूथपेस्ट तो वापरतो, ३ हजार रू. किमतीचा शांपू, येण्याजाण्यासाठी ऑडी कार, राहण्यासाठी ५० लाख रूपयांची रूम, २५ देशांचा व्हीसा, योगासाठी स्वतंत्र योग टिचर तसेच डाएट ठरविण्यासाठी परदेशी डायटिशियन. वाचून वाटेल की हे एखाद्या उद्योगपतीचे वर्णन असेल. पण नाही . हे आहे भारताचा सुपरस्टार कुत्रा एरिन याचे वर्णन. हैद्राबादेतील अभिमन्यू रेड्डी यांचा हा कुत्रा अमृतसर येथे भरलेल्या इंटरनॅशनल डॉग शो साठी आला होता.

या शोमध्ये सहभागी होण्यासाठी देशविदेशातून ५०० कुत्री आली हेाती. कुणी जहाजाने, कुणी विमानाने तर कुणी मर्सिडीज गाड्यांमधून.एरिूनही स्वतंत्र विमानाने आला पण त्यापूर्वीच त्याचे पाच रक्षक अमृतसरमध्ये दाखल झाले होते. सर्वात महागड्या हॉटेलात त्याच्यासाठी रूम बुक होती. अत्यंत कडक सुरक्षेत त्याला शोच्या जागी नेले गेले.

त्याचे मालक रेड्डी सांगतात, एरिनसाठी दोन शिफ्टमध्ये चोवीस तास डॉक्टर तैनात आहेत. पहाटे चार वाजता त्याच्यासाठी योगा टिचर येतात व योगा करून घेतात. अंघोळीसाठी वेगळा स्टाफ आहे तर स्वयंपाकीही वेगळे आहेत. इंटरनॅशनल ऑल ब्रीड डॉग शो चॅपियनशीपमद्ये त्याने टॉप टेन मध्ये स्थान मिळविले आहे. भारतात तो नंबर वन आहे. एरिनची किमत आहे ४० लाख रूपये.

Leave a Comment