विषुववृत्ताचे सान्निध्य सर्दीस कारण

विषुववृत्ताच्या जवळच्या प्रदेशात राहणार्‍या लोकांना निरनिराळ्या प्रकारच्या ऍलर्जीज्, दमा आणि सर्दी होण्याची जास्त शक्यता असते, असे एका अभ्यासात आता आढळून आले आहे. विषुवृत्ताच्या सान्निध्यातील प्रदेशात युव्ही-डी ही किरणे मोठ्या प्रमाणावर असतात आणि त्यांचा परिणाम म्हणून माणसाच्या शरीरातील ऍलर्जीचा बंदोबस्त करणार्‍या पेशी क्षीण होत असतात.

सूर्यप्रकाशात ड जीवनसत्व जास्त असते आणि त्यामुळेच ही युव्ही-बी किरणे निर्माण होतात आणि वाढतात, असे शास्त्रज्ञांना दिसून आले आहे. ड जीवनसत्वामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढत असते, परंतु त्याच्या घटकांमध्ये काही बदल झाले की त्यातून युव्ही-बी किरणे निर्माण होतात. यापूर्वी ऍलर्जीच्या संबंधात काही वेगळी संशोधने करण्यात आलेली आहेत. हवेतून येणार्‍या रोगजंतूंमुळे ज्या ऍलर्जीचा प्रादुर्भाव होतो तो सांस्कृतिक आणि सामाजिक वातावरणामुळे होतो असे पूर्वीच्या संशोधनात दिसून आले होते.

त्याचबरोबर या ऍलर्जीच्या मागे घरांच्या पद्धती आणि पर्यावरण यातील विविधताही आहे, असे काही संशोधकांचे मत होते. परंतु आता करण्यात आलेल्या नव्या संशोधनात अमेरिकेमध्ये डॉ. व्हिका ओक्टारिया यांनी ऍलर्जीच्या संबंध विषुवृत्ताच्या जवळ राहण्याशी जोडला गेला आहे. ऍलर्जी आणि अस्थमा हे मोठे गंभीर आजार आहेत आणि त्यांचे वेळेवर निदान झाले नाही, तसेच लवकरात लवकर उपचार झाले नाहीत तर रुग्णाच्या जीवाला धोका होऊ शकतो. विशेष म्हणजे हे आजार जवळपास जन्माचे सोबती असतात आणि ते केवळ कमी-जास्त होत राहतात.

एकदा अस्थमा किंवा दमा जडला की, त्याची संगत मरणाबरोबरच सुटते. या विकारातून पूर्णपणे मुक्त होणारे रुग्ण ङ्गारच अपवादात्मक असतात. अस्थमा झालेल्या ७५ ते ८५ टक्के रुग्णांच्या अस्थम्यामागे ऍलर्जीचे कारण असते. हा सारा संशोधनाचा उपद्व्याप अमेरिकन कॉलेज ऑङ्ग ऍलर्जी, अस्थमा आणि ऍन्ड इम्युनॉलॉजी या संस्थेने केला आहे. या संस्थेतून ऍलर्जीचे निदान करणारे तज्ज्ञ बाहेर पडत आहेत. त्यांना रुग्णाला नेमकी कशाची ऍलर्जी आहे याचे निदान करण्याचे प्रगत शिक्षण दिले जात आहे. या संस्थेच्या या नव्या संशोधनामुळे जगातल्या एका मोठ्या त्रासदायक विकारावर प्रकाश पडला आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment