खोब्रागडे यांच्या अटकेमागे तांत्रिक चूक

न्यूयॉर्क – अमेरिकेतल्या शासन यंत्रणेने खटला भरलेल्या भारतीय प्रतिनिधी देवयानी खोब्रागडे यांच्यावर गुन्हा दाखल करताना संबंधित कागदपत्रांच्या वाचनात शासकीय अधिकार्‍यांनी चूक केली असल्याचा आरोप खोब्रागडे यांचे वकील डॅनियल अरशॅक यांनी केला आहे. या प्रकरणावरून भारतातील जनतेच्या मनात मोठा प्रक्षोभ निर्माण झालेला आहे आणि त्यावरून दोन देशातल्या संबंधात तणाव वाढत चालला आहे.

देवयानी खोब्रागडे यांचे वकील अरशॅक यांनी न्यूयॉर्कमध्ये पत्रकारांशी बोलताना शासकीय अधिकार्‍यांवर आरोप केला. खोब्रागडे यांची मोलकरीण संगीता हिने दाखल केलेल्या ङ्गॉर्ममधील माहिती वाचताना सरकारी अधिकार्‍यांनी गङ्गलत केली आणि त्या गङ्गलतीवरून खोब्रागडे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे, असे अरशॅक म्हणाले.

सदर मोलकरणीने आपल्याला कमी पगार दिला जात असल्याची तक्रार केली आहे. परंतु तिला व्हिसा मिळवून देताना सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांत या संबंधात जो उल्लेख आलेला आहे तो नीट पाहिला गेला नाही आणि गैरसमजाने व्हिसाविषयक कायद्याची पायमल्ली केल्याचा गुन्हा खोब्रागडे यांच्यावर दाखल झाला आहे, असे अरशॅक यांचे मत आहे.